मी बजावणार मतदानाचा हक्क!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मार्च 2019

पुणे - ‘मतदान हा माझा हक्क आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी मी मतदान करणारच,’ असे म्हणत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी आपला हक्‍क बजावण्याचा निर्धार केला. मतदान करण्याची शपथ त्यांनी या वेळी घेतली.

सकाळ माध्यम समूह, राज्य निवडणूक आयोग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी संयुक्तपणे नवमतदार जागृती अभियान राबविले.

पुणे - ‘मतदान हा माझा हक्क आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी मी मतदान करणारच,’ असे म्हणत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी आपला हक्‍क बजावण्याचा निर्धार केला. मतदान करण्याची शपथ त्यांनी या वेळी घेतली.

सकाळ माध्यम समूह, राज्य निवडणूक आयोग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी संयुक्तपणे नवमतदार जागृती अभियान राबविले.

विद्यापीठातील दत्तो वामन पोतदार संकुलात सकाळी मोठ्या संख्येने विद्यार्थी जमले. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी त्यांना शपथ दिली. ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस यांनी ‘आय विल वोट’ उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, अभिनेत्री सुवर्णा काळे उपस्थित होते. 

डॉ. म्हैसेकर आणि डॉ. करमळकर यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन केले. मोनिका सिंह यांनी अजूनही मतदार नोंदणी सुरू असल्याचे सांगत, मतदार नोंदणी केली नसल्यास करून घेण्यास सांगितले. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असतानाही केवळ ५४ टक्‍क्‍यांपर्यंत मतदानाची आकडेवारी पोचते. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये आताच जनजागृती केली, तर भविष्यात त्यांना मतदान करण्याची सवय लागेल, असे त्यांनी नमूद केले.

डॉ. दीपक म्हैसेकर - मतदानाबाबत उदासीनता असणे हे देशासाठी धोकादायक आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. मतदान करणे ही जबाबदारी आहे. ती आपण पार पाडली पाहिजे. निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधी निवडण्याच्या आपल्या अधिकाराचा वापर निश्‍चितपणे करा.

डॉ. नितीन करमळकर - प्रत्येक विद्यार्थ्याला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणुकीच्या कोणत्याही टप्प्याच्या मतदानाच्या दिवशी विद्यापीठाने परीक्षा ठेवली नाही. तुम्ही सुज्ञ नागरिक आहात. मतदान करून ती सुज्ञता तुम्ही दाखवली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.

मोनिका सिंह - मतदानाचा दिवस हा फक्त सुटीचा दिवस नाही, तर मतदान करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी अजूनही नोंदणी सुरू ठेवली आहे. उमेदवारांचे अर्ज भरणे पूर्ण होईपर्यंत सुमारे एक लाख मतदारांची नोंदणी करणार आहोत. 

डॉ. प्रभाकर देसाई - मतदानाचा दिवस हा सुटीचा नव्हे; तर कर्तव्याचा दिवस म्हणून त्याकडे पाहावा. मतदान हे कर्तव्यच आहे. लोकशाही बळकट करण्याचा हा दिवस असतो. म्हणून त्या दिवशी आपला हक्क आपण बजावला पाहिजे.

Web Title: I Will Vote Oath