लढाऊ विमानाचा टायर फुटल्याने लोहगाव विमानतळावरील वाहतूक विस्कळीत

Pune_Airport.jpg
Pune_Airport.jpg

पुणे : लोहगाव विमानतळावर सरावादरम्यान हवाईदलाचे लढाऊ विमान उतरत असताना टायर फूटण्याची घटना सोमवारी सकाळी 10.00 ते 10.30 च्या सुमारास घडली. त्यामुळे ते विमान मुख्य धावपट्टीवरच अडकून पडले.

परिणामी पुण्याकडे येणारी आणि पुण्याहून जाणारी विमान वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. लोहगाव विमानतळावरील वाहतूक अद्याप पूर्ववत झालेली नाही. सुमारे 1.30 पर्यंत वाहतूक पूर्ववत होईल, असा अंदाज विमानतळ प्रशासनाने दिला आहे. या घटनेमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com