आयसीएसई आणि आयएससी परीक्षेचा निकाल जाहीर

ICSE_ICS_result.jpg
ICSE_ICS_result.jpg

पुणे : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेशन एक्‍झॅमिनेशन्सतर्फे (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत (आयसीएसई) 98.54 , तर बारावीच्या परीक्षेत (आयएससी) 96.52 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

दहावीच्या (आयसीएसई) परीक्षेत जुही कजरिया (मुंबई) आणि मनहार बन्सल (मुक्तसर) या दोघांनी 99.60 टक्के गुण मिळवीत देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. देशपातळीवरील पहिल्या तीन क्रमांकाच्या गुणवत्ता यादीत महाराष्ट्रातील 16 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर बारावीच्या (आयएससी) परीक्षेत देवांग कुमार अग्रवाल (कोलकता) आणि विभा स्वामिनाथन (बेंगलूर) या विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवीत देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. तर पहिल्या तीन क्रमांकाच्या गुणवत्ता यादीतील 54 विद्यार्थ्यांमध्ये तीन राज्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यात पुण्यातील सेंट मेरीज स्कूलमधील विश्रृती रंजन या विद्यार्थिनीने 99.50 टक्के गुण मिळवीत देशपातळीवर तिसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळविले आहे. 

आयसीएसई परीक्षा : 
- एकूण परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : एक लाख 96 हजार 271 
- विद्यार्थिनींची कामगिरी उल्लेखनीय; 99.05 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण 
- ही परीक्षा 60 विषयांमध्ये घेण्यात आली. यात 22 भारतीय भाषा, 10 परदेशी भाषा आणि दोन क्‍लासिकल भाषांचा समावेश आहे. 
- महाराष्ट्रातून 21 हजार 38 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा (विद्यार्थी :11 हजार 570/ विद्यार्थिनी :9 हजार 468)

आयएससी परीक्षा : 
- एकूण परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : 86 हजार 713 
- या परीक्षेत देखील 97.84 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण 
- ही परीक्षा 49 विषयांमध्ये घेण्यात आली. यात 14 भारतीय, सहा परदेशी आणि एक क्‍लासिकल भाषेचा समावेश आहे. 
- महाराष्ट्रातून दोन हजार 737 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा. (विद्यार्थी : एक हजार 308/ विद्यार्थिनी : एक हजार 429)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com