पुरावे खोटे निघाल्यास फासावर जाण्याची तयारी - धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

शिरूर - ""तीन वर्षांत राज्यातील अनेक मंत्र्यांनी सुमारे नव्वद हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असून, त्याचे पुरावे मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. या पुराव्यांच्या आधारे चौकशी झाल्यास राज्य सरकारचा बरबटलेला चेहरा जनतेसमोर येईल,'' असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले. पुरावे खोटे निघाल्यास फासावर जायची तयारी आहे, असेही ते म्हणाले. 

हल्लाबोल आंदोलनादरम्यान येथे झालेल्या सभेत मुंडे म्हणाले, ""शिक्षणमंत्र्यांनी महापुरुषांच्या फोटो खरेदीत भ्रष्टाचार केला, महसूलमंत्र्यांनी जमिनीचा अपहार केला, गृहनिर्माणमंत्र्यांनी शासकीय प्लॉटमध्ये गैरव्यवहार केला. तूरडाळ खरेदीत अडीच हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला. आमच्या बहिणीने चिक्कीचा घोटाळा केला. राज्य सरकारमधील 16 मंत्र्यांच्या गैरव्यवहाराचे पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असून, याबाबत चौकशी लावण्याची मागणी केली आहे; पण ही चौकशी करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांमध्ये नाही. चौकशीचा फार्स करून "क्‍लीन चिट' देऊन ते विषय दडपून टाकतात. आम्ही दिलेल्या पुराव्यांच्या आधारे सखोल चौकशी करावी.'' 

""सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे आश्‍वासन राज्यकर्त्यांनी दिले होते; परंतु ते हवेत विरले. लिंगायत समाजाला आरक्षण नाही, मराठा समाजाला न्याय नाही. मुस्लिम तर इथले नाहीतच अशा तोऱ्यात सरकार वागत आहे. सर्वांचीच फसवणूक झाल्याने सरकारविषयी सामान्य घटकांत असंतोष आहे,'' असे मुंडे म्हणाले. 

"...तर प्रत्येकाच्या डोक्‍यावर कर्ज' 
भाजप सत्तेवर आल्यास विदेशातील काळे धन आणून प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करू, असे आश्‍वासन नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी दिले होते. पण साडेतीन वर्षांत 15 पैसेही कोणाच्या खात्यावर आले नाहीत. उलट नीरव मोदी, विजय मल्ल्या हे बॅंकांना बुडवून पळून गेल्याने भविष्यात प्रत्येकाच्या डोक्‍यावर कर्जाचा बोजा येईल, अशी भीती धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. 

Web Title: If false evidence then it is ready to go to the gallows -mundhe