Pune News : आम्ही तक्रार करायला गेलो तर गावगुंडांकडून धमकी येते!

सुटुन आल्यावर पाहून घेऊ म्हणतात; महिला आयोगाच्या अध्यक्षांपुढे गोऱ्हे बुद्रुकच्या महिलांनी वाचला तक्रारींचा पाढा
If we complain we get threats from goons rupali chakankar police pune crime
If we complain we get threats from goons rupali chakankar police pune crimesakal

सिंहगड : 'गावातील महिला,मुलींना त्रास होत आहे. टवाळखोर तरुण गुन्हेगार बिनधास्त पणे गावात फिरत असतात. तक्रार करायला गेलो तर पाहून घेऊ म्हणतात' अशा अनेक तक्रारींचा पाढा सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथील महिलांनी महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांच्यापुढे वाचला. यावेळी महिला पदाधिकारी व हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे आदी उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी गोऱ्हे बुद्रुक येथील सराईत गुन्हेगारांनी हातात तलवार व कोयते घेऊन गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही महिलांनाही गुन्हेगारांनी शिवीगाळ करत मारहाण केली असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

हवेली पोलीसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत अकरा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला व तात्काळ पाच आरोपींना अटक केली. यातील चार आरोपी अद्यापही फरार आहेत.

फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी व यापुढे महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी गोऱ्हे बुद्रुक येथील महिलांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावरून चाकणकर यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन महिलांशी संवाद साधला.

यावेळी महिलांनी गावगुंड व सराईत गुन्हेगारांची दहशत व तक्रारींचा पाढा चाकणकर यांच्यापुढे वाचला. यावेळी महिलांना धीर देत याबाबत गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करण्याच्या सूचना चाकणकर यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.

"महिलांना निर्भिडपणे जीवन जगण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. समाजकंटकांच्या त्रासाला किंवा दहशतीला कोणीही घाबरण्याचे कारण नाही. गोऱ्हे बुद्रुक येथील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे. महिला आयोगानेहीही या प्रकरणात जातीने लक्ष घातले आहे."

- रुपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com