रस्त्यावरचं हेल्मेट नाय कामाचं!

रस्त्यावरचं हेल्मेट नाय कामाचं!

पुणे - केवळ पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी तुम्ही रस्त्यावरील स्वस्तातील हेल्मेट खरेदी करत असाल, तर सावधान! कारण या हेल्मेटवर आयएसआय मार्क असला तरी एखाद्या अपघातात ते तुमचे संरक्षण करेलच, याची खात्री नाही. 

रस्त्याच्या कडेला विक्री केले जाणारे बनावट आयएसआय मार्क असलेले हेल्मेट खरेदी करण्याकडे दुचाकीधारकांचा ओढा आहे. कारण हे हेल्मेट स्वस्तात मिळत आहे. बनावट आयएसआय मार्क असलेले हेल्मेट बाजारात ३०० ते ७०० रुपयांपर्यंत मिळत आहे. कमी किंमत आणि आयएसआय मार्क असल्याने दुचाकीधारक असे हेल्मेट मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. मात्र, ते खरंच सुरक्षित आहे का, अपघातात ते प्राण वाचवू शकते का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. 

या पार्श्‍वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने रस्त्यावरिल विक्रेत्याकडून आयएसआय मार्क असलेले हेल्मेट ३५० रुपयांत खरेदी केले. लक्ष्मी रस्त्यावरील एका दुकानातील ब्रॅंडेड हेल्मेटसोबत या हेल्मेटची ‘क्रॅश टेस्ट’ केली. त्यात हे हेल्मेट नापास झाले. 

एका ठोक्‍यात भगदाड
रस्त्यावरून घेतलेल्या हेल्मेटवर तीन किलो वजनाच्या हातोड्याने जोरदार ठोका मारला. मात्र, पहिल्याच ठोक्‍यात हेल्मेटला भगदाड पडले. तसेच काच तुटून थर्माकोलदेखील अस्ताव्यस्त झाले. आयएसआय हेल्मेटने पाच किलो वजनाचा मारा सहन करणे अपेक्षित आहे. हाच प्रयोग ब्रॅंडेड हेल्मेटवरही केला. हे हेल्मेट जमिनीवर वारंवार आपटूनदेखील त्याला काहीच झाले नाही.  

रस्त्यावरून हेल्मेट खरेदी करताना काळजी घ्यावी. कमी किमतीत मिळते आणि कारवाईपासून वाचू म्हणून कोणतेही साधे हेल्मेट खरेदी करू नका. डोक्‍याचे रक्षण करू शकेल असेच आयएसआय मार्क असलेले हेल्मेट खरेदी करा.
- कपिल गुप्ता, हेल्मेट विक्रेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com