नियम तोडल्यास तुरुंगवास वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

रवींद्र जगधने
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

आकडे बोलतात-
उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांवर आतापर्यंत भरलेले खटले : 72 
न्यायालयात दाखल केलेले आरोपपत्र : 12 
शिक्षा झालेले नागरिक : 3 

पिंपरी- तुम्ही जर चुकीच्या दिशेने वाहन चालवणार असाल तर थेट तुरुंगात जायची आणि अडीच हजार रुपये दंड भरायची तयारी ठेवा. वाहतूक पोलिसांनी नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

चिंचवड परिसरातील रस्त्यावर उलट्या दिशेने येणाऱ्या तीन दुचाकीस्वारांना दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी पकडले. त्यांच्यावर पिंपरी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल व न्यायालयाने दोघांना प्रत्येकी अडीच हजार रुपयांचा, तर एकाला अकराशे रुपयांचा दंड ठोठावला. 

या रस्त्यावर उलट्या दिशेने येतात वाहने 
* जुना पुणे-मुंबई रस्ता 
* मोरवाडी चौक, पिंपरी 
* शगुन चौक, पिंपरी 
* इंदिरा गांधी उड्डाण पूल, पिंपरी 
* केएसबी चौक, चिंचवड, एमआयडीसी 
* धावडे वस्ती ते अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी 
* काळेवाडी फाटा 
* कुदळवाडी चौक 

अशी होते कारवाई 
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांचे नंबर पोलिस टिपून घेतले जातात. त्यानंतर संबंधित वाहनचालकाचा पत्ता शोधून त्यांना थेट घरी जाऊन कारवाई करण्यात येत आहे. 

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. 
- पांडुरंग गोफणे, वाहतूक पोलिस निरीक्षक, मुख्यालय 

उपलब्ध मनुष्यबळ : 
पोलिस निरीक्षक : 7 
सहायक निरीक्षक : 4 
उपनिरीक्षक : 5 
पोलिस कर्मचारी : 248 
ट्रॅफिक वॉर्डन : 165 
एकूण विभाग : 7 (चिंचवड, भोसरी, पिंपरी, निगडी, हिंजवडी, सांगवी, तळेगाव-चाकण) 

बीआरटी मार्गावरील वाहनांवर होणार कारवाई 
बीआरटी मार्गावर अनेक खासगी वाहने बेधडकपणे घुसखोरी करतात. आपल्याकडे कुणाचे लक्ष नाही, अशी अनेकांची धारणा असते. मात्र, पोलिस आयुक्‍तांनी या मार्गावर घुसखोरी करणाऱ्या वाहनांचे नंबर टिपून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी सुरवात केली आहे. 

Web Title: If you break the rules then the strict action by police