पुणे : वाहतुकीचे नियम पाळताय? विमा कंपनी देतेय...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जानेवारी 2020

- वाहतूक पोलिस व बजाज अलियान्झ यांचा संयुक्त उपक्रम 

पुणे : शहरामध्ये वाहतुकीच्या नियमांची शिस्त पाळणाऱ्या वाहनचालकांना त्यांच्या मोटार वाहन विम्यावर आता 10 ते 15 टक्के सवलत मिळणार आहे. पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या पुढाकाराने बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सतर्फे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याबाबतची घोषणा गुरूवारी करण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम व बजाज अलियान्ज जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तपन सिंघेल यांनी या उपक्रमाची घोषणा केली. यावेळी पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, वाहतूक शाखेचे अतिरीक्त पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे, अतिरीक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु, बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सचे ससिकुमार अदिदामू, चंद्रमोहन मेहरा आदी उपस्थित होते. 

Image result for traffic rules

डॉ.वेंकटेशम म्हणाले, "वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्या 59 हजार वाहनचालकांनी "आभार' योजनेचा फायदा घेतला. त्याचे पुढचे पाऊल हा उपक्रम आहे. वाहतूक नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना बजाज अलियान्झने मोटार वाहन विम्यामध्ये सवलत देण्याची चांगली भूमिका घेतली आहे. पुण्यातील हा पथदर्शी उपक्रम देशामध्ये पहिल्यांदाच होत आहे. याच पद्धतीने अन्य विमा कंपन्याही पुढे आल्यास शिस्तप्रिय वाहनचालकांना चांगले प्रोत्साहन मिळेल.''

खातेवाटपाचा घोळ संपेना! 

सिंघेल म्हणाले, "वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना मोटार वाहन विम्यावर दहा ते 15 टक्‍क्‍यांची सवलत असणार आहे. ही सवलत एक वर्षासाठी असेल. त्यातून वाहतूक नियमांचे पालन करण्यास चालना मिळेल. हा प्रयोग देशभर राबविण्याचा आमचा उद्देश आहे'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you follow all Traffic Rules you will get Discount on Motor Insurance