देहविक्रय करणाऱ्या महिला संविधानाबाबत अनभिज्ञ

Prostitution
Prostitution

पुणे - बुधवार पेठ परिसरात देहविक्रय करणाऱ्या महिलांना आजही संविधान म्हणजे काय, हे माहिती नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रातिनिधिक सर्व्हेतून पुढे आला आहे. 

या सर्व्हेसाठी देहविक्रय करणाऱ्या ५० महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात चार प्रश्न विचारण्यात आले होते. संविधान म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का, या प्रश्‍नावर ९१.५ टक्के महिलांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. समानता माहिती आहे का, विचारल्यावर ६९.५ टक्के महिलांनी ‘नाही’ असे उत्तर दिले; तर तुम्हाला जीवनावश्‍यक सुविधा मिळत आहेत का, असे विचारल्यावर ७८ टक्के महिलांनी ‘नाही’ असेच उत्तर दिले आहे. 

ॲड. असीम सरोदे यांच्या मार्गदर्शनात विधी महाविद्यालयातील बोधी रामटेके, शुभम गुरव, संजोत शिरसाठ, प्रणव माने यांनी हे सर्व्हेक्षण केले. ज्या घटकांना गरज आहे, त्यांच्यापर्यंत संविधानाचे विचार पोचत नाहीत किंवा ते जाणीवपूर्वक पोचूच दिले जात नसल्याचे दुर्दैव यानिमित्ताने उघड झाले, असे रामटेके यांनी सांगितले. सहयोग ट्रस्टद्वारे अशा दुर्लक्षित समाजघटकांपर्यंत त्यांचे हक्क पोचण्याची मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे ॲड. स्मिता सरोदे-सिंगलकर यांनी सांगितले. 

अन्याय मात्र माहिती 
अन्याय म्हणजे काय, तुम्हाला माहीत आहे का, या प्रश्‍नांवर देहविक्रय करणाऱ्या तब्बल ९३.१ टक्के महिलांनी ‘हो’ असे उत्तर दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com