शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्षच 

ज्ञानेश सावंत
शनिवार, 5 मे 2018

पुणे - राज्यातील तत्कालीन आघाडी सरकारने राणा भीमदेवी थाटात भामा आसखेड योजनेची घोषणा केली खरी; मात्र तिच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर करण्याकडे सरकार डोळेझाक करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यावरील उपायांवर गांभीर्याने विचार होत नसल्यानेच शहराच्या पाणीपुरवठ्याची ही योजना वारंवार रखडत असल्याचे परिस्थितीवरून दिसून येत आहे. 

पुणे - राज्यातील तत्कालीन आघाडी सरकारने राणा भीमदेवी थाटात भामा आसखेड योजनेची घोषणा केली खरी; मात्र तिच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर करण्याकडे सरकार डोळेझाक करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यावरील उपायांवर गांभीर्याने विचार होत नसल्यानेच शहराच्या पाणीपुरवठ्याची ही योजना वारंवार रखडत असल्याचे परिस्थितीवरून दिसून येत आहे. 

दुसरीकडे मात्र प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करून त्यावर कार्यवाहीचा आदेश जिल्हा प्रशासनाला दिल्याचे सरकारचे म्हणणे आहे. तर जमिनीच्या मोबदल्यात जमीन हवीच, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. ही मागणी मान्य झाली, तरी तिची अंमलबजावणी शक्‍य नसल्याचे प्रशासकीय अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे सरकार आणि शेतकऱ्यांमधील चर्चेतून मार्ग निघेपर्यंत भामा आसखेड योजनेचे काम पूर्ण होणे अवघड असल्याचे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर जाणवले. 

योजनेचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. परंतु शेवटच्या टप्प्यातील काही कामे आटोपण्याआधी मागण्यांची पूर्तता करण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. या अटीवर शेतकरी कामात अडथळे आणत नाहीत. त्यानुसार जलवाहिनीचे काम होण्याआधीच त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न सोडवावा लागणार आहे. प्रत्यक्षात मात्र पुनर्वसनाच्या प्रस्तावांवर ठोस भूमिका घेतली जाण्याची शक्‍यता तरी दिसत नाही. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष घालून तोडगा काढल्यास योजनेचे काम पूर्ण होऊन पूर्व भागातील नागरिकांना पाणी मिळू शक्‍य होईल. 

शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार गंभीर आहे. त्यानुसार चर्चा करून त्यांच्या मागण्या सोडविण्यात येतील. पण योजनेच्या कामात अडचणी येऊ नयेत, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. ज्यामुळे पूर्व भागातील लोकांना पुरेसे पाणी मिळणार आहे. 
गिरीश बापट, पालकमंत्री 

योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याचे क्षेत्र 
58 चौरस किलोमीटर 

योजनेतील कामे आणि खर्च 
मुंढवा जॅकवेल - 83 कोटी 28 लाख रुपये 

भामा आसखेड धरण ते कुरुळी गाव (अशुद्ध जलवाहिनी) 
8.3 किलोमीटर : (1700 मिलिमीटर व्यास) 
17.8 किलोमीटर (1600 मिलिमीटर व्यास) 

127 कोटी 32 लाख रुपये 

भामा आसखेड धरण ते कुरुळी गाव (शुद्ध जलवाहिनी) 

16.64 किलोमीटर ( 1600 मिलिमीटर व्यास) 
72 कोटी 54 लाख रुपये 

जलशुद्धीकरण केंद्र कुरुळी गाव) 
दोन लाख लिटर क्षमतेचे केंद्र 
60 कोटी 4 लाख रुपये 

फीडर मेन (जलवाहिनी) 
डी. वाय. पाटील कॉलेज ते खराडी 
साठवण टाक्‍यांना जोडणारी पोलादी जलवाहिनी 
29.59 किमी 
वितरण वाहिनी 
17.75 किमी 
57 कोटी 53 लाख रुपये

Web Title: Ignore the demands of the farmers