बाजार समितीचे अतिक्रमणांकडे दुर्लक्ष

encroachment of the market committee
encroachment of the market committee

पुणे - शेतकऱ्यांचे हित जपण्यापेक्षा कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्यावर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाकडून भर दिला जात असल्याचे चित्र आहे. बाजार आवारातील मोकळी जागा शोधा आणि टपरी, स्टॉल उभारा असा कार्यक्रम सुरू आहे. बाजारातील गणेश मंदिराजवळच आणखी एक स्टॉल उभा राहिला आहे. 

बाजार आवारातील वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र बाजार समितीचे प्रशासन तयार करते. मात्र, अप्रत्यक्षपणे अतिक्रमणांना पाठबळ दिले जात असल्याचे सिद्ध झाले आहे. 

तीन महिन्यांपूर्वी बाजार आवारातील गणेश मंदिराच्या डाव्या बाजूला एक स्टॉल उभा राहिला. या स्टॉलच्या विरोधात आडते असोसिएशनने बाजार समितीकडे तक्रार केली होती. तो हटविण्यात आला नाही, उलट या स्टॉलसमोरच असलेल्या मोकळ्या जागेत आणखी एक स्टॉल उभा राहिला आहे. 

बाजार आवारातील आडतदारांनी त्यांच्या गाळ्यासमोरील जागेवर पंधरा फुटापेक्षा अधिक जागेत माल ठेवला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. त्याचवेळी प्रशासक मंडळाच्या आशीर्वादाने आवारात स्टॉल उभे राहू लागले आहेत. समितीच्या सचिवपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बी. जे. देशमुख यांनी अतिक्रमणे काढू असे जाहीर केले होते. यापूर्वी उभ्या राहिलेल्या स्टॉलच्या संदर्भात पणन संचालकांनीही बाजार समितीकडून खुलासा मागविला होता. यासंदर्भात बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांनी हा स्टॉल कोणी सुरू केला याची कल्पना नसल्याचे सांगत योग्य ती कारवाई केली जाईल असे नमूद केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com