‘सकाळ’च्या वृत्तमालिकेकडे पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष
पुणे - मुठा उजव्या कालव्याच्या दुरवस्थेची ‘सकाळ’च्या टीमने प्रत्यक्षात पाहणी करून सद्यःस्थिती मांडली होती. मात्र, हा प्रश्न पाटबंधारे विभाग व महापालिका प्रशासनास गंभीर वाटला नाही. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी कालवा फुटून त्याचा फटका शेकडो लोकांना बसला.

‘सकाळ’ने जानेवारी २०१३ आणि जानेवारी २०१६ या काळात खडकवासला ते स्वारगेटपर्यंतच्या कालव्याची पाहणी केली होती. त्यात स्वारगेट ते हडपसर या परिसरात कालव्याच्या भोवती झोपडपट्ट्या, वीटभट्ट्या, मोठमोठे गृहप्रकल्प, मत्स्यपालन शेती आहे. अनेक ठिकाणी कालव्याजवळच अतिक्रमण झाले असल्याचेही निदर्शनास आले होते. याबरोबरच कालव्याच्या भिंतीला विठ्ठलवाडी येथे मोठे भगदाड पडून होत असलेला पाण्याचा अपव्यय, कालव्याच्या संरक्षणाकडे होणारे दुर्लक्ष या स्वरूपाची निरीक्षणे वृत्तमालिकेद्वारे नोंदवली होती. मात्र, त्याकडे पाटबंधारे व महापालिका प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नाही.