बेकायदा जाहिरातींना लगाम

बेकायदा जाहिरातींना लगाम

पुणे - भाड्याची थकबाकी आणि मुदत संपूनही बेकायदा जाहिरात फलक (होर्डिंग) उभारणाऱ्यांविरोधात महापालिका आता कठोर भूमिका घेणार आहे. भाड्याची रक्कम, फलकाच्या परवानगीची मुदत आणि त्यानंतरच्या कारवाईचे स्वरूप याचा फलकावर उल्लेख राहणार असून, त्यानंतरही भाडे थकविणाऱ्यांचे फलक लगेचच उतरविले जाणार आहे. 

महापालिकेच्या उत्पन्नात झालेली घट, नवे आर्थिक स्रोत आणि त्यावरील कार्यवाहीसाठी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी गुरुवारी खातेप्रमुखांची बैठक घेतली. बांधकाम परवाना शुल्क, मिळकतकर, त्याची थकबाकी आणि आकाशचिन्ह विभागाचे उत्पन्न यावर चर्चा करण्यात आली. तसेच, बेकायदा ‘होर्डिंग’वरून अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येईल का, याचीही चाचपणी या बैठकीत आयुक्त केली. मुदत संपल्यानंतरही फलकांवर जाहिराती घेण्यात आल्याचे उघड झाले आहे. राजकीय हस्तक्षेपामुळेच अशा कारवाई होत नसल्याचे स्पष्ट आहे.

न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे थकबाकी वसुलीस विलंब
मिळकतकराची थकबाकी सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यापैकी काही थकबाकी वसूल होत असली तरी न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे थकबाकी वसूल करण्यात अडचणी असल्याचे दिसून आले आहे; मात्र पुढील वर्षभरात ही सगळी प्रकरणे प्राधान्याने घेऊन मिळकतराचे उत्पन्न वाढविण्याकडे लक्ष देण्याची सूचनाही गायकवाड यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com