अवैध धंद्यांविरोधात श्राद्ध आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

पिंपरी - शहरातील वाढती गुन्हेगारी व अवैध धंद्यांविरोधात अपना वतन संघटनेने शनिवारी (ता. 12) सायंकाळी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यावर "श्राद्ध आंदोलन' केले. मद्याच्या बाटलीला पुष्पहार घालून पोलिस प्रशासनाचा निषेध केला. पोलिसांना शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याची व अवैध धंदे बंद करण्याची सुबुद्धी यावी, अशी प्रार्थना करण्यात आली.

संघटनेचे अध्यक्ष सिद्दिक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेल्या आंदोलनात सचिव दिलीप गायकवाड, कार्याध्यक्ष राजू शेरे, महिला शहराध्यक्ष राजश्री शिरवळकर, संपर्क प्रमुख हरिश्‍चंद्र तोडकर, प्रवक्‍त्या सॅन्ड्रा डिसोझा, फ्रान्सिस गजभिये, फारुख शेख, चॉंद सय्यद, भारिपचे आकील सय्यद, दिवेश पिंगळे, सतीश कदम यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शेख म्हणाले, 'पोलिसांच्या व राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने शहरात गुन्हेगारांना, अवैध धंद्यांना अभय मिळाले आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही पोलिस याची गांभीर्याने दाखल घेत नाहीत. पोलिस उपायुक्तांच्या कार्यालयाशेजारी असलेल्या ठिकाणाहून संपूर्ण शहरात अवैध मद्याचा पुरवठा होतो. पोलिस कारवाई करीत नाहीत. त्यामुळे उपायुक्तांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त होत आहे.''

आंदोलनानंतर वरिष्ठ निरीक्षक भीमराव शिंगाडे यांना निवेदन देण्यात आले. तसेच भोसरी परिसरातील गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर कारवाईबाबत चर्चा करण्यात आली. शिंगाडे यांनी अवैध धंदे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल व कारवाईचा अहवाल सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

अवैध धंद्यांवर कारवाई सुरूच असते. अवैध धंद्यांची ठिकाणे दाखविल्यास धडक कारवाई करण्यात येईल, असे कार्यकर्त्यांना सांगितले आहे.
- सतीश पाटील, सहायक पोलिस आयुक्त

Web Title: illegal business shraddha agitation bhosari police station