पार्किंगसाठी काळेवाडीत बेकायदा शुल्क

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

पिंपरी - काळेवाडी येथे रस्त्याच्या कडेला दिवसरात्र थांबणाऱ्या माल वाहतूक ट्रक, खासगी कंपन्या व ट्रॅव्हल बसचालकांकडून पार्किंगसाठी गावगुंडांकडून बेकायदा शुल्क आकारले जाते; तसेच हा बीआरटी मार्ग असून, रस्त्याच्या कडेला थांबलेल्या वाहनांमुळे कामात अडथळा निर्माण होतो, अशी नागरिकांची तक्रार आहे. 

काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता बीआरटी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून, काळेवाडी फाटा ते एमएम महाविद्यालयापर्यंत बीआरटी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे; तर एमएम महाविद्यालय ते पवना नदीपर्यंतचे काम सुरू आहे. काम पूर्ण झालेल्या व सुरू असलेल्या या मार्गाचा वापर पार्किंगसाठी होतो. या वाहनांचा कामात अडथळा होतो. अनेकदा कामही बंद ठेवण्याची वेळ येते, असे कामगारांनी सांगितले. 

तसेच उभ्या केलेल्या वाहनांसाठी महिन्याला सातशे ते आठशे रुपये चालकांकडून गावगुंड घेतात. या ठिकाणी थांबणाऱ्या वाहनांची यादी त्यांच्याकडे असून पैसे न देणाऱ्या वाहनचालकाला मारहाण केली जाते किंवा वाहनांची तोडफोड होते. 

त्यांना स्थानिक राजकारण्यांचा आशीर्वाद असल्याने प्रशासनही याकडे दुर्लक्ष करते, असे नागरिकांनी सांगितले. 

वाहने रात्री थांबत असतील, तर रस्त्याच्या कामाला अडथळा येण्याचे कारण नाही. मात्र या वाहनांमुळे रहदारीस अडथळा होत असेल, तर वाहतूक पोलिसांना कारवाईचे अधिकार आहेत. 
- विजय भोजने, बीआरटी प्रवक्ते, महापालिका

Web Title: Illegal charges in Kalewadi for parking

टॅग्स