लोणी काळभोरमध्ये अवैध दारू विक्री; 15 हजाराची देशी-विदेशी जप्त

 Illegal confiscation of domestic and foreign liquor worth Rs 15000
 Illegal confiscation of domestic and foreign liquor worth Rs 15000

लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली ) हद्दीतील खोकलाईमाता चौकातील किराणा दुकानात चक्क बेकायदेशीररित्या देशी-विदेशी दारू विकत असल्याची घटना रविवारी (ता.०७) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. अनिल तिलकचंद देसर्डा  (वय- ६१, रा. खोकलाई चौक, लोणी काळभोर, ता. हवेली) असे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या किराणा दुकानदाराचे नाव आहे. त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीची देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली असल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल देसर्डा यांचे खोकलाई चौकात अजय किराणा नावाने किराणा मालाचे दुकान आहे. या दुकानात अवैधरित्या दारू-विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस हवालदार रोहिदास पारखे, नितीन गायकवाड, मारुती बाराते आणि प्रियांका धावडे यांचे पथक तयार केले.

हातभट्ट्यांच्या जागेवर चिमुकल्यांसाठी मैदान ! मुळेगाव तांड्याची ओळख पुसण्यासाठी...

दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस दुकानात गेले असता त्यांना दुकानांमध्ये पंधरा हजार रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूच्या विविध कंपनीच्या  बाटल्या आढळून आल्या.  दुकानदाराकडे सदर दारू विक्रीचा परवाना मागितला असता परवाना नसल्याची कबुली अनिल देसर्डा याने दिली. त्यानुसार अनिल देसर्डा याच्याबर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात बेकायदेशीर दारूची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर करीत आहेत.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com