अनधिकृत होर्डिंगप्रकरणी पाचपट दंडाचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

पिंपरी - शहरातील खासगी व महापालिकेच्या जागेत जाहिरात फलक अर्थात फ्लेक्‍स व होर्डिंग लावण्यासाठी स्वतंत्र धोरण महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाने आखले आहे. गुरुवारी (ता. २०) होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर ते मंजुरीसाठी ठेवले आहे. नवीन धोरण मंजूर झाल्यास अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्या संस्था व व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून पाचपट दंड वसूल केला जाणार आहे. 

पालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाने शहरात एक हजार १२१ ठिकाणी जाहिरात फलक लावण्यासाठी लोखंडी सांगडे उभारले आहेत. त्यात एक हजार ७६९ जाहिरात फलक लावले आहेत. महापालिका स्थापनेपासून जाहिरात फलक लावण्यासाठी स्वतंत्र धोरण आखले नाही. शहरात विविध ठिकाणी जाहिरात पत्रके चिकटविली जातात. त्याला आळा घालण्यासाठी आकाशचिन्ह परवाना विभागाने मराठी व इंग्रजीत जाहिराती करण्यासाठी स्वतंत्र जाहिरात धोरण तयार केले. त्यास विधी समितीने मान्यता दिली. सर्वसाधारण सभेने त्यास मान्यता दिल्यास अनधिकृत जाहिरातला आळा बसणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

Web Title: Illegal Hording Fine Proposal Crime