चासमध्ये अवैध दारू विक्री व्यवसाय महिला व तरूणांकडून उध्वस्थ (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

चास (ता.खेड) : येथे गेली एक वर्षापासून अवैधपणे दारू विक्री सुरू असून, या दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्थ झाले आहेत. शेवटी वैतागुन शुक्रवार (ता.१७) गावातील रणरागिणींनी व तरूणांनी सदर अवैध दारू विक्री करणार्‍या ठिकाणावर जावून, अवैधपणे विक्री होत असलेली दारूची कॅन ओतून फोडून टाकली.

अनेकदा पोलिस स्टेशनपासून थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत अर्ज करूनही हा बेकायदेशीर व्यवसाय बंद होत नव्हता. केवळ चिरीमिरीमुळे हा व्यवसाय दिवसेदिवस चासमध्ये फोफावत चालला होता. अखेर अवैध दारू विक्री करणार्‍या ठिकाणावर दारू विक्री करणार्‍या महिलांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. या महिलांनी या तरूणांना व जाब विचाररऱ्या महिलांना धमकी देवून ''गावात माणूस राहणार नाही'', अशा वल्गना केल्या. याशिवाय ''आम्ही कोणाकोणाला पैसे देवून आमचा धंदा कोणाच्या कृपाअशिर्वादाने सुरू आहे'' याचीही माहिती दिली. त्यामुळे चिडून  रणरागिणीं महिला व तरूणांनी अवैधपणे विक्री होत असलेली दारूची कॅन ओतून फोडून टाकली.

याबाबत नेमकी पोलिस प्रशासन व दारूबंदी विभाग काय भुमिका घेतो हे पाहणे गरजेचे आहे. अवैधपणे व्यवसाय करून गावाला वेठीस धरणार्‍यांमुळे गावात माञ भितीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Illegal liquor business in Chas is destroyed by women and youth