बारामतीच्या जिरायत भागात बेकायदेशीर दारु विक्री

विजय मोरे
बुधवार, 27 जून 2018

उंडवडी(बारामती) -  बारामती तालुक्याच्या जिरायती भागात बेकायदेशीर दारु धंद्यानी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे एकीकडे पाण्याचा दुष्काळ दारुचा सुकाळ' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

जिरायती भागातील उंडवडी सुपे, कारखेल, देऊळगाव रसाळ, खराडेवाडी आदी गावात बेकायदेशीर दारु धंद्यानी मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला आहे. विशेष म्हणजे खुल्ले आम दारु विक्री सुरु झाली आहे. त्यामुळे तरुणपिढी व्यसनाधीन झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यानच्या काळात सगळे दारुधंदे वडगाव निंबाळकर पोलिसांनी बंद केले होते. मात्र अलीकडच्या महिनाभरात या दारु धंद्यानी पुन्हा डोके वर काढले आहे. 

या भागात अद्यापही दमदार पाऊस नसल्याने ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई आहे. मात्र दारुधंदे जोरात सुरु असल्याने पाण्याचा दुष्काळ असला तरी दारुचा सुकाळ असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. खराडेवाडी येथे दोन ठिकाणी बेकायदेशीर दारु विक्री सुरु आहे. तसेच देऊळगाव रसाळ आणि कारखेल मध्ये तीन ते चार ठिकाणी दारु विक्री जोरात खुल्लीआम सुरु आहे. तसेच उंडवडी सुपे हद्दीतील अनेक हॉटेल व धाब्यावर दारु विक्री सुरु आहे. या दारुधंद्यातून दररोज मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असल्याने दारु धंद्यावाल्यांनी या भागात दहशत माजवली आहे. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध तक्रार देण्यास ग्रामस्थ धजवत नाहीत. तसेच बहुतांशी पुढाऱ्यांनाच संध्याकाळी दारु लागतेय. त्यामुळे त्यांच्याकडूनही " तेरी भी चूप और मेरी चूप "अशी स्थिती आहे. अशी एका सर्वसामान्य ग्रामस्थाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. 

या बेकायदेशीर दारु धंद्यावर पोलिसांनी छापा टाकून दारुधंदे बंद करावेत. अशी मागणी या भागातील महिला व ग्रामस्थांकडून होत आहे. 
 
Web Title: Illegal liquor sale in Baramati's Jirayat area