पुणे - जुन्नरच्या आदिवासी भागात बेकायदेशीर माती उपसा सुरू

दत्ता म्हसकर
शनिवार, 12 मे 2018

जुन्नर (पुणे) : जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागातून मोठया प्रमाणात बेकायदेशीरपणे माती उपसा होत असून महसूल विभागाने अशा प्रकारे अनधिकृत माती उपसा करणाऱ्याच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी होत आहे. 

जुन्नर (पुणे) : जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागातून मोठया प्रमाणात बेकायदेशीरपणे माती उपसा होत असून महसूल विभागाने अशा प्रकारे अनधिकृत माती उपसा करणाऱ्याच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी होत आहे. 

सामाजिक कार्यकर्ते संदीप उत्तर्डे यांनी माती वाहतूक करणाऱ्या एका वाहनास अडवून त्याच्याकडे परवाना मागितला असता तो त्याने दाखविला मात्र हा परवाना उंडेखडक येथील माती उपसा करण्याचा होता आणि प्रत्यक्षात खडकुंबे येथून अनधिकृतपणे माती काढुन तिची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे त्यांना आढळून आले. परवाना एका ठिकाणचा व माती उपसा दुसरी ठिकाणी अशी परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.  भर दिवसा होत असलेल्या माती उत्खनन व वाहतुकीकडे महसूल विभागाचे कर्मचारी दुर्लक्ष करीत असून यामागे वेगळे कारण असल्याची चर्चा आहे.

माती वाहतूक करताना दोन ब्रास पर्यंतच गाडीत माती भरणे आवश्यक असते प्रत्यक्षात मात्र क्षमतेपेक्षा अधिक सुमारे चार ते पाच ब्रास माती गाडीत भरली जाते.यामुळे अशा वाहनांचे अपघात झाल्याचा घटना घडल्या आहेत.
माती वाहतूक करणारी वाहने गाडी चालक धोकादायक पध्दतीने वाहने चालवीतात, दुसऱ्या वाहनास जाण्यासाठी जागा देत नाहीत. गाडीतील मातीवर ताडपत्री टाकत नाहीत यामुळे वाऱ्याने माती उडून रस्त्याने जा-ये करणारे नागरिक तसेच मागील वाहन चालकांच्या डोळ्यात जाते जाऊन अपघात संभवतात. यामुळे महसूल विभागाने धडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

Web Title: illegal soil from tribal area of junnar