एमआयडीसीत अवैध वाहतूक ठरतेय जीवघेणी; वाहतूक विभागाचा कानाडोळा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

चाकण एमआयडीसीच्या चार ही टप्प्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर आणि जोखमीची वाहतूक केली जात आहे. लोखंडी प्लेट, बांधकामाचे स्टील, कागदी बंडल, मोठमोठ्या मशीन अशी बरीच अवजड वाहतूक या भागात होत असते, परंतु ही वाहतूक करताना बऱ्याच वेळा माल गाडीबाहेर आलेला असतो. माल बाहेर आल्यानंतर त्याला धोक्याची सूचना देणारी काहीही व्यवस्था केली जात नसल्याने अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी आंबेठाण येथे तर कागदी बंडल घेऊन जाणाऱ्या गाडीतून बंडल खाली पडून एका पादचारी इसमाला आपला जीव गमवावा लागला होता.

आंबेठाण : एमआयडीसी भागात मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त आणि गाडी बाहेर माल भरून वाहतूक केली जात असल्याने ती नागरिकांना जीवघेणी ठरत आहे. कमी वाहतुकीत जास्त माल वाहतूक करता यावी आणि त्या माध्यमातून अधिक नफा शिल्लक रहावा या हेतूने धोकादायक आणि जीवघेणी वाहतूक केली जात आहे. एकीकडे अपघातास निमंत्रण देणारी अशी धोकादायक वाहतूक रोखण्याची मागणी केली जात आहे.तर दुसरीकडे या भागात आरटीओचे अधिकारी येतात परंतु सर्वसामान्य नागरिकांना कायद्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून दंड वसुली केली जाते पण बड्याना मात्र यात सूट दिली जात असल्याने वाहतूक विभागाच्या कारवाईवर शंका व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चाकण एमआयडीसीच्या चार ही टप्प्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर आणि जोखमीची वाहतूक केली जात आहे. लोखंडी प्लेट, बांधकामाचे स्टील, कागदी बंडल, मोठमोठ्या मशीन अशी बरीच अवजड वाहतूक या भागात होत असते. परंतु ही वाहतूक करताना बऱ्याच वेळा माल गाडीबाहेर आलेला असतो. माल बाहेर आल्यानंतर त्याला धोक्याची सूचना देणारी काहीही व्यवस्था केली जात नसल्याने अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी आंबेठाण येथे तर कागदी बंडल घेऊन जाणाऱ्या गाडीतून बंडल खाली पडून एका पादचारी इसमाला आपला जीव गमवावा लागला होता.भांबोली येथे एक महिला जागीच ठार झाली होती. दोन दिवसांपूर्वी वराळे येथे भरधाव मालवाहू गाडीने एकाचा पाय मोडला असून त्याला कायमचे अपंग व्हावे लागले.एकंदरीत अशा अवैध वाहतुकीने अपघात आणि पर्यायाने मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

पीएमपी प्रवाशांना आता मासिक पासमुळे मिळणार दिलासा ! 

या भागाचा समावेश पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात केल्यानंतर वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या या भागात वरच्यावर फेऱ्या होतात परंतु केवळ दुचाकीस्वार आणि लहान चारचाकी वाले यांनाच त्यांच्याकडून कायद्याचा बडगा दाखविला जात आहे.रस्त्याच्या कडेला अवैधपणे उभी राहून वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने,बेकायदा प्रवाशी वाहतूक,कंपन्यांच्या प्रवेशद्वाराबाहेर होणारी बेकायदा पार्किंग,ओव्हरलोड माल भरलेली वाहने यांच्यावर कारवाई करण्याला मात्र वाहतूक विभाग धजावत नाही. सर्वसामान्य नागरिकांना दंड फाडायला लावणारा वाहतूक विभाग या बड्या धेंडांवर कारवाई करणार का? असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal transport at MID is becoming fatal dangerous