आपत्तीपूर्वीच आयएमडी सुचविणार ॲक्‍शन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

पुणे - हवामानाचा अंदाज वर्तविणे इतकी मर्यादित भूमिका आता भारतीय हवामान खात्याची (आयएमडी) नक्कीच राहिलेली नाही. वातावरणातील बदलाचा त्या भागातील लोकांवर नेमका काय परिणाम होणार आहे हे सांगितले पाहिजेच. पण, त्यापुढे जाऊन त्यापासून काळजी घेण्यासाठी लोकांनी काय करावे, हेदेखील आयएमडी सुचविणार आहे, अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन नायर राजीवन यांनी गुरुवारी येथे दिली. 

साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरमचे (सॅसकॉफ) उद्‌घाटन डॉ. राजीवन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. 

Web Title: IMD identity action before disaster