पुणेकरांच्या दिवाळीवर पावसाचे पाणी; अजून राहणार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. लक्षद्वीपच्या परिसरात याची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर येथे पुढील दोन ते तीन दिवस आकाश ढगाळ रहाणार असून पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील.

पुणे : शहरात सुटीच्या दिवशीही आज (रविवार) सकाळपासून पावसाच्या जोरदार सरींना सुरवात झाली. पुढील चोवीस तास पावसाच्या सरी पडत राहतील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे देण्यात आला.  

शहर आणि परिसरात शनिवारी सकाळपासून पाऊस पडत आहे. पावसाची ही धार आज सकाळपर्यंत सुरू असल्याचे दिसते. मॉन्सून देशातून परत गेला मात्र पुण्यातील पावसाळा काही संपत नाही, असे चित्र दिसत आहे. 

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. लक्षद्वीपच्या परिसरात याची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर येथे पुढील दोन ते तीन दिवस आकाश ढगाळ रहाणार असून पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील, असेही खात्याने स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IMD predicts rainfall in diwali at Pune