esakal | पुणे जिल्हा परिषदेत १८८ अधिकाऱ्यांची तत्काळ भरती; तुम्ही पात्र आहात?
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus-Medical-Officers

पुणे जिल्ह्यात ९७ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या केंद्रांमध्ये १८८ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.

पुणे जिल्हा परिषदेत १८८ अधिकाऱ्यांची तत्काळ भरती; तुम्ही पात्र आहात?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने तत्काळ १८८ समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर) भरती करण्यात आली आहे. या सर्वांना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात (सब पीएचसी) नियुक्ती देण्यात आली असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या मदतीने फ्ल्यू क्लिनिक सुरू करणे, कोरोना विषाणू संसर्गाचा रूग्ण सापडलेल्या भागाचे सर्वेक्षण करणे, संशयित रुग्णांना लक्षणानुसार होम किंवा इन्स्टियूशनल क्वरांटाईन करणे आणि गरज भासल्यास संशयितांना रुग्णालयात दाखल करण्याची शिफारस करणे आदी कामे केली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे यांनी सांगितले.

- मोठी बातमी : दीड लाख ऊसतोड कामगार मूळगावी परतणार; राज्य सरकारची परवानगी!

पुणे जिल्ह्यात ९७ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या केंद्रांमध्ये १८८ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. शिवाय ५३७ आरोग्य उपकेंद्र आहेत. यापैकी १८८ उपकेंद्रांना समुदाय आरोग्य अधिकारी मिळाले आहेत. 

- माजी महापौरांसह 48 जणांना पोलिसांनी बनवला कोंबडा; व्हिडिओ पाहाच

तालुकानिहाय समुदाय अधिकारी : 

आंबेगाव - १३, बारामती आणि भोर - प्रत्येकी १५, दौंड - १८, हवेली - २३, इंदापूर आणि पुरंदर - प्रत्येकी ९, जुन्नर - २६, खेड - १९, मावळ - १२, मुळशी - ८, शिरूर - १४ आणि वेल्हे - ७.

loading image