सीएनजी बस खरेदी प्रक्रिया लवकर राबवा - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

पुणे - आगामी काळात डिझेलच्या बस घेऊ नये, सीएनजी आणि इलेक्‍ट्रिक बस खरेदीची प्रक्रिया लवकर राबवावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून प्रलंबित प्रकल्प लवकर मार्गी लावण्याबाबतही त्यांनी संबंधितांना सांगितले. 

एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री पुण्यात आले होते. या वेळी त्यांनी महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, पीएमपीएलचे संचालक व नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, आयुक्त सौरभ राव यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. बसखरेदीच्या संदर्भात त्यांनी सीएनजीवरील चारशे आणि पाचशे इलेक्‍ट्रिक बस खरेदीची प्रक्रिया लवकर राबविण्याचे आदेश दिले. नवीन बस खरेदी करताना एकही बस डिझेलवर चालणारी घेऊ नका, भाडेतत्त्वावरील बसेसही डिझेलवर चालणाऱ्या नको, असे त्यांनी सांगितले. या पार्श्‍वभूमीवर बसखरेदीची निविदा प्रक्रिया तातडीने राबविणार असल्याचे शिरोळे यांनी सांगितले. 

प्रलंबित काम मार्गी लावण्याच्या सूचना 
आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कामे मार्गी लावण्यात यावीत. बसखरेदी, वेस्ट एनर्जी, एचसीएमटीआर रस्ता या प्रकल्पांकडे विशेष लक्ष द्या, अशी सूचनाही त्यांनी केली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी खासगी कंपन्यांच्या मदतीने बससेवा सुरू करण्यासाठी भाजपच्या शहराध्यक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या बसही आता सीएनजी किंवा ई-बसच घ्याव्या लागतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

Web Title: Immediately start the CNG bus purchase process says Chief Minister