पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन; परीक्षेच्या कामकाजावर परिणाम

Pune-University
Pune-University

पुणे - अंतिम वर्षाच्या परीक्षेची तयारी सुरू केलेली असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यात परीक्षा विभागातील 163 कर्मचारी, अधिकाऱ्यांना सहभागी झाले आहेत. त्यामुळे मोजक्‍या 10 ते 12 अधिकारी व कर्मचारी काम करत असून, थेट परिणाम परीक्षेवर होण्याची शक्‍यता आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य सरकारने विद्यापीठाने शिक्षकेतर कर्मचारी, अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला नाही, आश्‍वासित प्रगती योजना बंद केली आहे. तसेच विद्यापीठ, महाविद्यालयातील रिक्त पदे भरावीत, पाच दिवसांचा आठवडा लागू करा यासह इतर मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी 24 सप्टेंबर पासून राज्यातील अकृषिक विद्यापीठांमध्ये लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे.
यामध्ये पुणे विद्यापीठातील कर्मचारी सहभागी आहेत. त्याचा फटका परीक्षा विभागातील तयारीला बसला आहे.

कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी कर्मचाऱ्यांच्या लेखणीबंद आंदोलनामुळे विद्यापीठाचे कामकाज ठप्प झाल्याचे सांगितले.

पुणे विद्यापीठ शिक्षकेतर सेवक कृती समितीचे उपाध्यक्ष डॉ. सुनील धिवार म्हणाले, 'परीक्षेचे काम सुरू असले तरी आम्हाला नाइलाजास्तव आंदोलन करावे लागत आहे. वारंवार निवदेन देऊनही सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. सोमवारी (ता.28) सकाळी मुख्य इमारत येथे सर्व कर्मचारी एकत्र जमून निषेध करणार आहोत.

'परीक्षा सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत, त्याचा परिणाम परीक्षेच्या कामावर झाला आहे. त्यामुळे विषयांचे तज्ज्ञ व इतर काहीजणाकडून तयारी सुरू आहे.''
- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com