कामगार संपाचा बॅंका, पोस्ट, बीएसएनएल कार्यालयांवर परिणाम 

Untitled-1.jpg
Untitled-1.jpg

पुणे : संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला पुणे शहरातूनही मोठा प्रतिसाद मिळाला. पोस्ट कार्यालय, महावितरण, भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल), बॅंकांमधील कर्मचारी मोठ्या संखेने संपामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे या सर्व कार्यालयांमध्ये नाममात्र काम पार पडले. या संपाविषयीची माहिती आधीच झाल्यामुळे अनेक नागरिकांनी संपाच्या दिवशी कार्यालयांमध्ये येण्याचे टाळलेले दिसत होते. परंतु, ज्यांना माहीत नव्हते असे नागरिक जेव्हा कार्यालयांमध्ये येत होते तेव्हा त्यांना कर्मचाऱ्यांकडून संपाविषयची माहिती देऊन पुन्हा माघारी पाठविण्यात येत होते. 

दरम्यान फोटो झिंको, समाज कल्याण, शिक्षण, आरोग्य, पाटबंधारे, धर्मादाय, कृषी आदी सरकारी कार्यालये मात्र नियमत सुरू होती. या कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांनी संपाला पाठिंबा दर्शविला आहे. परंतु, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी दुपारी जेवणाच्या वेळात अर्धातास येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आणि संपामध्ये आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. 


''केंद्रा प्रमाणे दिले जाणारे भत्ते, एचआरए, वाहतूक भत्ता, होस्टेल भत्ता, बाल संगोपनाची रजा आजपर्यंत कधीही मिळाली नाही. कामगारांच्या कंत्राटी करणामुळे शासनाचेच नुकसान होत आहे. आम्ही नागरिकांशी बांधील आहोत म्हणून संपाला पूर्ण पाठिंबा दिला तरी कार्यालयीन काम थांबवले नाही.''
- मारुती शिंदे, अध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना पुणे जिल्हा 

''पोस्ट कार्यालयामध्ये सर्वच स्तरातील कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. नवीन पेन्शन, प्रमोशन, ग्रामीण आणि कंत्राटी डाक सेवकांना खात्याच्या सुविधा मिळाव्यात. इंटरनेटची सुविधा प्रचंड धीम्या गतीची असल्याचा त्रास ग्राहका सोबतच कर्मचाऱ्यालाही सहन करावा लागतो. आज चार कर्मचाऱ्यांचे काम एकाला करावे लागत आहे.''
- यमाजी बांबळे, विभागीय सचिव, अखिल भारतीय डाक कर्मचारी संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com