‘महिला सुरक्षिततेसाठी नागपूर पॅटर्न राबवा’

Usha-Dhore
Usha-Dhore

पिंपरी - शहरातील महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या संदर्भात कडक उपाययोजना करावी, नोकरी अथवा कामानिमित्त रात्री प्रवास करणाऱ्या महिलांना त्यांच्या घरापर्यंत पोचविण्यासाठी नागपूर पोलिसांप्रमाणे यंत्रणा उभारावी, अशी मागणी महापौर उषा ढोरे यांनी पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे केली.

महापौर ढोरे यांनी पोलिस आयुक्त बिष्णोई यांची सोमवारी (ता. ९) भेट घेऊन महिलांच्या सुरक्षेबाबत निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, ‘‘काही वर्षांपासून देशातच महिलांच्या असुरक्षेचा प्रश्‍न गंभीर होत आहे. त्यामुळे शहरातील महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची समाजाप्रमाणेच पोलिसांचीही जबाबदारी आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याची आवश्‍यकता आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून शहरात गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र आहे. शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात रोडरोमिओंचा प्रश्‍न गंभीर आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस, महिला व विद्यार्थिनींमध्ये संवाद व्हायला हवा. जनजागृती व्हावी. तक्रार घेऊन येणाऱ्या महिलांना पोलिस ठाणे व चौकीमध्ये सन्मानाची वागणूक मिळावी. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातील रोडरोमिओंना आळा घालण्यासाठी निर्माण केलेल्या पोलिस पथकांना अधिक सतर्क करण्यात यावे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com