भोसरी - विदर्भ सहयोग मित्र मंडळाद्वारे आयोजित केलेल्या विदर्भ महोत्सवात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना ‘विदर्भभूषण’ पुरस्कार डॉ. शरद निंबाळकर, गजानन दाळू यांच्या हस्ते देण्यात आला.
भोसरी - विदर्भ सहयोग मित्र मंडळाद्वारे आयोजित केलेल्या विदर्भ महोत्सवात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना ‘विदर्भभूषण’ पुरस्कार डॉ. शरद निंबाळकर, गजानन दाळू यांच्या हस्ते देण्यात आला.

नळगंगा, वैनगंगा आणि पैनगंगा या तीन नद्यांचा प्रकल्प राबवा

भोसरी - राज्य सरकारने जलव्यवस्थापनासाठी नळगंगा, वैनगंगा आणि पैनगंगा या नद्यांचा प्रकल्प राबविणे उपयुक्त ठरेल. त्यामुळे परिसर सुजलाम्‌ सुफलाम्‌ होईल, असे मत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी व्यक्त केले.

भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात रविवारी (ता. १) विदर्भ सहयोग मित्र मंडळाद्वारे आयोजित विदर्भ महोत्सवाच्या उद्‌घाटन प्रसंगी ते पुढे म्हणाले की, विदर्भ हा सुपीक, कृषिप्रधान, खाद्य, भाषा, संस्कृती, आचार-विचाराने समृद्ध असा भाग आहे. तरीही, या भागात कापूस, सोयाबीन अशा मालाला भाव नाही. विदर्भाला गतवैभवप्राप्तीसाठी सरकारने जलव्यवस्थापनाची अंलबजावणी करून या भागातील दारिद्य्र दूर करावे.’

या वेळी महापौर उषा ढोरे, आमदार महेश लांडगे, माजी आमदार गजानन दाळू, विठ्ठल वाघ, उद्योजक विनायक भोंगाळे, माजी उपमहापौर शैलजा मोरे, मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिगंबर इंगोले, कार्याध्यक्ष प्रा. गुलाब देशमुख आदी उपस्थित होते. या वेळी सुवर्णमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

महापौर ढोरे म्हणाल्या, ‘पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात विदर्भवासीयांचे मोठे योगदान आहे.’ दाळू म्हणाले, ‘विदर्भात राजकीय नेतृत्वाचा अभाव हाच विदर्भाचा दोष आहे. यामुळे विदर्भ मागासलेला राहिलेला आहे.’

पुरस्कारार्थी डॉ. रवींद्र कोल्हे म्हणाले की, पुणे-मुंबईसारख्या शहरातील विदर्भातील नागरिकांनी मेळघाटातील दुर्गम भागातील जनतेचे आरोग्य, शेती, शिक्षणात सुधारणा होण्यासाठी योगदान दिले पाहिजे. मेळघाटातील जनता गरीब असली, तरी आत्महत्या करीत नाही. कारण, तेथे निसर्ग समृद्ध आहे.

कार्यक्रमासाठी सारंगधर पल्हाडे, देविदास आढे, दिलीप देशमुख, दीपाली गुल्हाने, कल्पना तिजारे, गणेश कवडे, रामेश्वर वानखडे, राजन लाखे आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक डॉ. इंगोले यांनी केले. सूत्रसंचालन नीलेश म्हसाये यांनी केले. अरुण इंगळे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com