दूधदराची अंमलबजावणी सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

भवानीनगर - राज्य सरकारने ठरवलेले दुधाचे ५ रुपये अनुदान आजपासून सुरू झाले असून, दूध उत्पादकांना आणखी एक दिलासा म्हणजे गायीच्या दुधाची केंद्राने नव्याने ठरविलेली प्रत स्वीकारली असून, आता ३.२ फॅट असलेले दूध स्वीकारण्याचे बंधन सहकारी व खासगी दूध संस्थांना घातले आहे. फक्त या दुधासाठी १९.१० रुपये व ५ रुपये अनुदान, असे २४.१० रुपये प्रतिलिटर असा दर ठरविण्यात आला आहे.

आज दुग्धविकास खात्याचे सचिव किरण कुरुंदकर यांनी नव्याने परिपत्रक काढून राज्यातील सर्व सहायक निबंधकांनाही हे सूचित केले आहे. राज्य सरकारने दूध आंदोलनादरम्यान तोडगा काढताना ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ या प्रतीच्या दुधासाठी २५ रुपये प्रतिलिटर असा सरसकट दर जाहीर केला होता. मात्र, या दराची अंमलबजावणी करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत दूध प्रकल्पांनी हा मुद्दा मांडला होता.

त्यानुसार दुग्ध खात्याने केंद्र सरकारने नव्याने गायीच्या दुधाची ठरविलेली मात्रा स्वीकारली आहे. यामध्ये संकरित व जास्त दूध देणाऱ्या गायी अधिक पाणी पितात, त्यामुळे त्यांची योग्य प्रतीच्या दुधाचीच फॅट ३.२ पर्यंत असते, त्याचे संशोधन केंद्र सरकारने स्वीकारून ३.२ फॅट ही नवी प्रत ठरविली होती. आता राज्यातही ३.२ फॅटचे दूध स्वीकारले जाईलच, शिवाय ३.३. फॅट असेल, तर त्या दूध उत्पादकास प्रतिलिटर सध्याच्या अनुदानासह २४.४० रुपये, ३.४ फॅट असेल, तर २४.७० रुपये प्रतिलिटर दर मिळेल. दरम्यान, (ता. १ ऑगस्टपासून) आम्ही २५ रुपये प्रतिलिटर दूध दर देत आहोत. हे हमीपत्र दूध संस्थांनी सरकारला सादर करण्याचेही बंधन घातले असून, दुधाची राज्यातील उत्पादित ३० हजार १८३ टन भुकटीसाठी ५० रुपये प्रतिकिलो अनुदानही आजपासून सुरू झाले आहे. मात्र, भुकटी निर्यात झाली आणि दूध उत्पादकांना प्रतिलिटर २५ रुपये दर दिला तरच सरकारचे अनुदान संस्थांना मिळणार आहे.

Web Title: Implementation of milk