मोबाईलबरोबर मातीमधील खेळाचे महत्त्वाचे; सुधीरचंद्र जगताप

अलीकडे मोबाईलचा वापर वाढला आहे. मात्र, मोबाईलचा वापर गरजेपुरता केला पाहिजे. त्याचबरोबर मातीमधील खेळाचे महत्त्वाचे आहेत.
Mallkhamb
Mallkhambsakal
Summary

अलीकडे मोबाईलचा वापर वाढला आहे. मात्र, मोबाईलचा वापर गरजेपुरता केला पाहिजे. त्याचबरोबर मातीमधील खेळाचे महत्त्वाचे आहेत.

उंड्री - अलीकडे मोबाईलचा (Mobile) वापर (Use) वाढला आहे. मात्र, मोबाईलचा वापर गरजेपुरता केला पाहिजे. त्याचबरोबर मातीमधील खेळाचे (Games) महत्त्वाचे आहेत. देशाचे भविष्य तरुण-तरुणींच्या हातामध्ये आहे, असे मत प्रशासकीय अधिकारी सुधीरचंद्र जगताप (Sudhirchandra Jagtap) यांनी व्यक्त केले.

महंमदवाडी येथे सोल्जर युथ फाऊंडेशनच्या सहकार्याने हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी केले होते. यावेळी लहान मुलांनी मल्लखांब, कराटे, रोप वे, १७ मजली इमारतीवरून रेपलिंग, कौले फोडणे, फायर वॉक, मर्दानी खेळ, सेल्फ डिफेन्स, तलवार बाजी लाठीकाठी सेल्फ डिफेन्स, नांनचाकू फिरवणे, झेंड्याला मानवंदना, एनसीसी परेड अशा कसरती करून दाखविल्या.

Mallkhamb
पुणे, मुंबईमध्ये ‘आयटी’त मराठी टक्का कमीच!

याप्रसंगी राष्ट्रीय पाटील तालीम संघाचे अध्यक्ष उल्हास तुपे, संतोष भानगिरे, अभिमन्यू भानगिरे, सचिन भानगिरे, डॉ. बालगुडे, नीता भोसले, अॅड. लक्ष्मी माने, विद्या होडे, वैशाली काळे, राणी फरांदे उपस्थित होते. यावेळी अण्णासाहेब महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सुरुवाती झाली, तर नृत्य, बक्षीस वितरणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

सोल्जर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष तुषार कदम, सुधीरचंद्र जगताप, वसंत आजमाने, सुजाता हलपतराव, शिवकन्या बेळगे, मीरा बाबर, दीनानाथ बाविस्कर, रामदास मदने, बाळासाहेब आबनावे, प्रताप भोसले, अशोक जाधव, पुरुषत्तम काळे, प्रकाश घाटकर, किरण चौधरी, जयपाल दगडे पाटील, नरेश गोला यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com