दिल्लीपर्यंत पोहचविण्यात मिसाळ यांचा मोलाचा वाटा- रामदास आठवले

राजकुमार थोरात 
रविवार, 1 जुलै 2018

वालचंदनगर : एम.बी.मिसाळ हे सर्व समाजाला बरोबर घेवून समाजकार्य करणारे कार्यकर्ते होते. मला दिल्लीमध्ये पोहचविण्यात त्यांचा मोलाचा सहभाग असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला. 
जंक्शन येथील सामाजिक कार्यकर्ते एम.बी.मिसाळ व सचिन कांबळे यांच्या दुचाकीचा 19 एप्रिल रोजी अपघात झाला होता. या अपघातामध्ये  कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला व मिसाळ यांचा 19 जून रोजी मृत्यू झाल्याची घटना घडली. आज रविवार (ता. 1) रोजी जंक्शन (ता.इंदापूर) येथे सर्वपक्षीय शोक सभेमध्ये आयोजन केले होते.  

यावेळी, इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आरपीआयचे ज्येष्ठ कार्यकर्ते गंगाधर आंबेडकर, इंदापूचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे, आरपीआयचे सोलापूरचे राजा सरवदे, पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पीपल रिपब्लीकन पक्षाचे संजय सोनवणे, आरपीआरयचे पुणे जिल्हाचे अध्यक्ष सुर्यंकांत वाघमारे, दादासो धांडोरे, पंचायत समिती सदस्या शैला फडतरे, जंक्शनचे सरपंच राजकुमार भोसले, कर्मयोगीचे संचालक वसंत मोहोळकर, सुरज वनसाळे, भाजपचे माऊली चवरे उपस्थित होते.

यावेळी आठवले यांनी सांगितले की, एम.बी मिसाळ सर्व समाजातील नागरिकांना जोडणारा पँथर होता. कुटूंबाकडे दुर्लक्ष करुन समाजाच्या नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्य दिले. वालचंदनगर गाव हे पँथरचा बालेकिल्ला होता. माझ्या खांद्याला खांदा लावून त्यांनी पँथर वाढविण्यासाठी व नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. मला दिल्लीमध्ये पोचविण्यामध्ये त्यांनी मोलाची साथ दिली. त्यांच्याकडे आरपीआयच्या पश्‍चिम महाराष्ट्राची जबाबदारी होती. पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये मन जोडणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अचानक अपघातील निधनामुळे लढवय्या पँथर हरपला असून कुंटूबावरती आघात झाला आहे.

एम.बी.मिसाळ यांचे अपुरे राहिलेले सामाजिककार्य त्यांचा मुलगा आतीष पूर्ण करेल. आज पँथर सारख्या लढवया कार्यकर्त्यामुळे आरपीआय पक्ष संपूर्ण देशामध्ये झपाट्याने वाढत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. यावेळी मान्यवरांनी मनोगते व्यक्त करुन एम.बी.मिसाळ यांना श्रद्धांजली अपर्ण केली. एम.बी.मिसाळ यांचे चिरंजीव आतीष मिसाळ यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले. 

स्मारक, सभागृहासाठी निधी देणार - आठवले
एम.बी.मिसाळ यांचे सामाजिककार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या आठवणी कायम राहाव्यात यासाठी स्मारक अथवा सभागृह उभारण्यासाठी 15 ते 20 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा आठवले यांनी केली.

Web Title: important contribution for misal to reach Delhi - Ramdas Athavale