पुण्यातील मॉल, हॉटेलबाबत महत्वाची बातमी 

ho.jpg
ho.jpg

पुणे : शहरातील मॉल, रूम असलेले हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस सुरू करण्याची परवानगी दिल्याने पुन्हा ग्राहकांच्या सेवेस हजर होण्यासाठी आवश्यक असलेली तयारी त्या ठिकाणी सुरु झाली आहे. मंगळवारी दिवसभर शहरातील अनेक हॉटेल व मॉलमध्ये साफसफाई सुरू असल्याचे चित्र पहायला मिळाले.

सेवा देण्यास पूर्णपणे तयार झाल्यानंतर ग्राहक यायला हवे, अशी अपेक्षा हे व्यवसायिक बाळगून आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून हे सर्व व्यवसाय बंद होते. ते सुरू करण्यास परवानगी देताना सुरक्षाविषयक खबरदार्‍या घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आवश्यक असलेले बदल या सर्व ठिकाणी करण्यात येत आहेत. गेटवरच निर्जंतुकीकारणाची सुविधा बसवणे, ग्राहकांच्या पर्स व बॅग ठेवण्यासाठी स्वतंत्र व प्रशस्त व्यवस्था, कोरोनाविषयक जनजागृती करणारे व सुरक्षेबाबतचे बोर्ड जागोजागी लावणे, मॉल किंवा हॉटेलमध्ये आल्यानंतर कमीत-कमी ठिकाणी स्पर्श होण्यासाठी आवश्यक असलेले बदल, कोणत्याही एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, अशी रचना करण्यात येत आहे.

वाहने पार्क करत असताना त्यांच्या निर्जंतुकीकारणाची सोय पार्किंगमध्ये पुरवली जात आहे. 33 टक्के कर्मचाऱ्यांमध्ये व्यवस्थापन कसे करण्यात करता येईल, याबाबतचे नियोजन सध्या करण्यात येत आहे. तर कामाच्या ठिकाणी कोणती खबरदारी घ्यायची, ग्राहकांना सेवा पुरवत असताना त्यांना कोणत्या सूचना करायच्या याबाबतचे मार्गदर्शन व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांना करण्यात येत आहे. 

याबाबत 'शिदोरी रेस्टॉरंट'चे पुरुजीत पोळ यांनी सांगितले की, सध्या रेस्टॉरंटची स्वच्छता करण्यात येत आहे. ग्राहक व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सोयी निर्माण करण्यावर भर आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यकता आलेले सर्व नियम पाळले जाणार आहेत. गर्दी नियंत्रित राहील, असे नियोजन करण्यात आले आहे.

स्वच्छ आणि सुरक्षित शॉपिंग पुरवणे हे आमचे सुरुवातीपासूनचे ध्येय आहे. सुरक्षाबाबतची नियमावली मॉलमध्ये कडकपणे अवलंबवली जाणार आहे. मॉलच्या आवारातील प्रत्येक टचपॉईंटवर वाढविण्यात आलेल्या स्वच्छताविषयक नियमांचे पालन केले जाईल. याबाबत सर्व ग्राहक, किरकोळ विक्रेते आणि कर्मचाऱ्यांचे सातत्याने निरीक्षण केले जात आहे.-शशांक पाठक, संचालक, वेस्टएंड मॉल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com