esakal | संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजेंची पुण्यात महत्वपूर्ण भेट; चर्चा सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजेंची 
पुण्यात भेट; चर्चा सुरू

संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजेंची पुण्यात भेट; चर्चा सुरू

sakal_logo
By
शरयू काकडे

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात पुन्हा वातावरण तापले असून येत्या 16 जूनला कोल्हापुरातून मोर्चा काढण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांची आज पुण्यात दुपारी एक वाजता भेट होणार आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. या भेटीमध्ये काय चर्चा होणार याची उत्सुकता सर्वांना आहे.

मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात सगळीकडे तीव्र प्रतिसाद उमटले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मराठा समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. मराठा आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणून संभाजीराजे यांच्याकडे पाहिले जात आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका घेत संभाजीराजे छत्रपतींनी यांनी राज्यभर दौरे करत नेत्यांच्या भेटी घेतल्या. येत्या16 जूनला कोल्हापुरात मराठा मोर्चा काढण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर उदयनराजेंसोबत होणारी बैठक महत्वाची ठरणार आहे.

हेही वाचा: Rain Coat Fashion : पावसाळ्यात राहा स्टायलिश!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर असून आज सकाळीच त्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. आज सकाळी अजित पवार अचानकपणे शाहू छत्रपती यांच्या भेटीसाठी न्यू पॅलेस येथे उपस्थित झाले. ''सर्व मुद्द्यांवर अजित पवारांसोबत चर्चा झाली. मराठा समाजासाठी जे काही करणे शक्य आहे, ते सरकारने करावे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर दिलेला निकाल पुन्हा एकदा अभ्यासला पाहिजे, समजून घेतला पाहिजे.'' अशी माहिती श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी या भेटीबाबत दिली आहे

loading image