वाढीव गुणांबाबत सुधारित नियमावली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

पिंपरी - राज्य सरकारने इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थी खेळाडूंसाठी क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत सुधारित नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये सहावी ते दहावीपर्यंत जिल्ह्यापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या विद्यार्थी खेळाडूंना दहावीच्या परीक्षेत वाढीव गुणांचा लाभ देण्यात आला आहे. मात्र, जिल्ह्यापासून राज्य स्तरापर्यंतच्या स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना वाढीव क्रीडा गुण सवलत बंद करण्यात आली आहे. 

राज्य सरकारने एप्रिल २०१५ मध्ये माध्यमिक शालान्त (इयत्ता दहावी) आणि उच्च माध्यमिक शालान्त (इयत्ता बारावी) परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थी खेळाडूंना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, काही त्रुटींमुळे बऱ्याच खेळाडूंना त्याचा लाभ मिळत नसल्याचे विविध क्रीडा संघटनांनी सरकारला कळविले होते. त्यामुळे राज्य सरकारने सुधारित नियमावली जाहीर केली आहे.  

या निर्णयानुसार सहावी ते दहावीपर्यंतच्या काळात प्रावीण्य मिळवून त्याबाबतच्या गुणांचा खेळाडूने एकदा लाभ घेतल्यास त्याला परत बारावीसाठी लाभ घेता येणार नाही.

याखेरीज जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावरील क्रीडा स्पर्धांत केवळ प्राविण्य प्राप्त केलेल्या तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भाग घेतलेल्या किंवा प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थी खेळाडूंनाच क्रीडा सवलतीचे वाढीव गुण दिले जाणार आहेत.

अशी आहे सुधारित नियमावली...
 इयत्ता दहावी-बारावीच्या मार्च २०१९ पासूनच्या परीक्षेपासून क्रीडा गुण सवलत लागू होणार.
 जिल्ह्यापासून राज्य स्तरापर्यंतच्या प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना ३,५,७ गुण मिळणार. 
 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभाग आणि प्रावीण्यासाठी ७ ते २५ गुण दिले जाणार.   
 राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), स्काउट गाइड विद्यार्थ्यांना गुण सवलतीचा लाभ.
  शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रस्ताव १ जानेवारी ते ५ एप्रिलपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे सादर करावेत.

राज्य सरकारने राज्य, राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागी खेळाडूंचे क्रीडा गुण कमी केले आहेत. त्याने क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंच्या सहभागावर परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे सहावी ते बारावीपर्यंतच्या राज्य, राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडूंना कोणत्याही अटीशिवाय वाढीव गुण दिले जावेत.
- शरदचंद्र धारूरकर, अध्यक्ष, राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ 

Web Title: Improved rules for enhanced points