Elon Musk : पुण्यात तरुणांनी इलॉन मस्क यांच्या फोटोची पूजा करत केलं अनोखं आंदोलन; कारण...

Pune News
Pune News

पुणे - सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या वैवाहिक बलात्कार जनहित याचिकेविरोधात पुरुषांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांकडून पुण्यात आगळेवेगळे आंदोलन केले. यावेळी तरुणांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ट्विटरचे सीईओ एलोन मस्क यांच्या फोटोची पूजा करत आरतीही सादर केली.

Pune News
Sharad Pawar : "शरद पवारांची चावी कुठेही चालते" ; शिंदे सरकारमधील मंत्र्यांचे विधान!

सेव इंडियन फॅमिली फाउंडेशन तर्फे हे आगळे वेगळे आंदोलन करण्यात केले. आमच्या सारख्या तरुणांवर महिलांकडून खोटे आरोप करून आमच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होतात. आम्हाला न्याय मिळत नाही. मात्र ट्विटर हे असे एकमेव स्थळ आहे जिथे आम्हाला मुक्तपणे व्यक्त होयला मिळतं म्हणून आम्ही इलॉन मस्क यांची पूजा करून त्यांचे आभार मानतो आहे, असं एका तरुणाने यावेळी सांगितलं.

सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशन (SIFF) चे पुरुष कार्यकर्ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्रीवादी स्वयंसेवी संस्थांनी दाखल केलेल्या वैवाहिक बलात्कार कायद्याच्या निषेधार्थ देशव्यापी आंदोलन करत आहेत. SIFF च्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय जवळ खोट्या वैवाहिक बलात्काराच्या प्रकरणांबद्दल जनजागृती आणि निषेध दर्शवण्यासाठी आज आंदोलन केले.

Pune News
KCR : "...तर मी महाराष्ट्रात येणे बंद करेन" ; चंद्रशेखर राव यांचे थेट फडणवीसांना आव्हान

सर्व कायदे हे स्त्री आणि पुरुष हा भेदभाव न करता समान केले पाहिजेत. कौटुंबिक हिंसाचाराने पीडित पुरुषांना न्यायालयाने संरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com