पुणे : पूर्व हवेलीत स्वॅब तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना...

पुणे : पूर्व हवेलीत स्वॅब तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना...

उरुळी कांचन (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथे महिनाभरापूर्वी सुरु करण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये, संशयित कोरोना रुग्णांच्या स्वॅब (घशातील द्रव) तपासणीसाठी लागणाऱ्या व्हीटीएम किटचा अपुरा पुरवठा होत असल्याने पूर्व हवेलीमधील संशयित कोरोनाचे रुग्ण व रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांना स्वॅब (घशातील द्रव) तपासणीसाठी धावपळ करावी लागत आहे. स्वॅब (घशातील द्रव) तपासणीसाठी लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, पत्रकार व अधिकाऱ्यांचे वारंवार उंबरे झिजवूनही, कोरोनाचे रुग्ण व रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांना वेंटींग करावीच लागत आहे. 

कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी कोरोना (स्वॅब) चाचणी ही अत्यंत महत्वाची गोष्ट. कारण स्वॅब (घशातील द्रव) चाचणीमुळेच नेमके रुग्ण लक्षात येतात. त्यांच्यावर आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांवर उपचार करणं किंवा विलगीकरणं करणं सोपं जातं. मात्र, मागील वीस दिवसांपासून कोरोनाने हाहाकार माजवलेल्या पूर्व हवेलीत मात्र व्हीटीएम किटच्या अपुरा पुरवठ्यामुळे स्वॅब तपासणी व विलगीकरणाला आरोग्य विभागाकडून फाटा दिला जात असल्याची धक्कादायक बाब रोजच घडत आहे. यामुळे पूर्व हवेलीमधील कोरोना आटोक्यात येईल ही अपेक्षा ठेवणे म्हणजे "मुंगरीलाल की हसीन सपने" ठरणार आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पूर्व हवेलीमधील कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन, लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात महिनाभरापूर्वी स्वॅब (घशातील द्रव) चाचणीसाठी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले होते. मात्र, कोविड केअर सेंटर सुरु झाल्यापासूनच्या पहिल्या दिवसापासूनच, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून स्वॅब (घशातील द्रव) चाचणीसाठी लागणाऱ्या व्हीटीएम किटचा अपुरा पुरवठा होत आहे. यामुळे स्वॅब तपासणीसाठी आलेल्या प्रत्येकांची तपासणी करावी, अशी इच्छा कोविड केअर सेंटरमधील आरोग्य सेवकांच्या मनात असूनही, नाईलाजास्तव तपासणीशिवाय नागरिकांना परत पाठवावे लागत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिरुरचे खासदार अमोल कोल्हे, शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार या दोघांनाही, दहा दिवसापुर्वी उरुळी कांचन येथे आरोग्य विभाग व महसुल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लोणी काळभोर येथे कोविड सेंटरला पुरेसे व्हीटीएम किट तात्काळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही अद्यापही पुरेसे किट उपलब्ध होत नाहीत. तर दुसरीकडे खुद्द जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शनिवारी (ता. ११) मांजरी बुद्रुक येथे जिल्हा परीषद व महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोणी काळभोर येथील कोविड सेंटरला पुरेसे व्हीटीएम किट तात्काळ उपलब्ध करुन द्यावेत असे आदेश दिले आहेत. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही, आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, किट उपलब्द करुन देण्याचे प्रयत्न चालु असल्याचे मोघम उत्तर देऊन पूर्व हवेलीमधील नागरिकांना गॅसवरच ठेवले आहे.

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत अधिक माहिती देताना नाव न छापण्याच्या अटीवर आरोग्य विभागातील एक अधिकारी म्हणाले, उरुळी कांचन, लोणी काळभोर, मांजरी बुद्रुक, कदमवाकवस्तीसह पूर्व हवेलीत मागील दहा दिवसांपासून सरासरी वीस ते तीसच्या दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण रोजच आढळून येत आहेत. एका रुग्णांच्या संपर्कात सरासरी पाच जण जरी धरले तरी, लोणी काळभोर येथील कोविड केंद्रात स्वॅब तपासणीठीच्या तीनशेहून अधिक व्हिटीएम किटची आवश्यकता आहे. मात्र, सध्या सरासरी सत्तर किट दिल्या जात आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोग्य विभागाकडे किट वाढवून मिळावेत याबाबत दिवसातून दोन ते तीनवेळा लेखी मागणी केली जात आहे. मात्र, आश्वासनाशिवाय हाती काहीही लागत नाही. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक हायरिस्क नाकेवाईकांची स्वॅब तपासणी करणे अंत्यत गरजेचे आहे. मात्र, किटच मिळत नसल्याने आरोग्य विभाग हतबल बनला आहे. यामुळे हवेलीमधील कोरोनाची लाट थोपवणे ही बाब  "मुंगरीलाल की हसीन सपने" ठरणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com