प्रदीप कंद यांच्या वाढदिवसानिमित्त सीसीटीव्ही, आरओ प्लॅंटचे उद्‌घाटन

शरद पाबळे
मंगळवार, 8 मे 2018

कोरेगाव भीमा : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या वाढदिवसानिमित्त लोणीकंद (ता. हवेली) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सीसीटीव्ही यंत्रणा व आर. ओ. फिल्टर पाणी एटीएम यंत्रणेचे उद्‌घाटन करण्यात आले. वृक्षारोपण, तसेच विधायक उपक्रमाचेही आयोजन केले होते.

कोरेगाव भीमा : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या वाढदिवसानिमित्त लोणीकंद (ता. हवेली) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सीसीटीव्ही यंत्रणा व आर. ओ. फिल्टर पाणी एटीएम यंत्रणेचे उद्‌घाटन करण्यात आले. वृक्षारोपण, तसेच विधायक उपक्रमाचेही आयोजन केले होते.

लोणीकंद ग्रामपंचायतीने उभारलेल्या या दोन्ही प्रकल्पाचे उद्‌घाटन आज कंद तसेच लोणीकंदचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच सागर गायकवाड, उपसरपंच रवींद्र कंद, सदस्य योगेश झुरुंगे, रामदास ढगे, संगीता शिंदे, संतोष लोखंडे, मंदा कंद, शीतल कंद, पूजा खलसे, सोहम शिंदे, कीर्तन होले, सुरेखा होले, शैला कंद, जयश्री झुरुंगे, अश्विनी झुरुंगे, ग्रामविकास अधिकारी के. एल. थोरात, तसेच नारायणराव कंद, रघुनाथ तापकीर, बाळासाहेब मोरे, रामभाऊ कंद, गोरक्ष कंद, तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय कंद, माजी सरपंच लीना कंद, अनिता कंद, लक्ष्मी कंद, माजी उपसरपंच गजानन कंद, चंद्रकांत मगर, शुभांगी ढगे, विशाल कंद आदींसह मान्यवर उपस्थित होते.

सुमारे साडेसहा लाख रुपये खर्चून गावात 24 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून, त्यामुळे गाव, शाळा व हायस्कूल परिसरावर लक्ष ठेवणे शक्‍य झाले आहे. चोरी, छेडछाडीसारख्या प्रकारांना आळा बसणार आहे, असे सरपंच सागर गायकवाड, उपसरपंच रवींद्र कंद व ग्रामविकास अधिकारी के. एल. थोरात यांनी सांगितले.
ताशी तीन हजार लिटर क्षमतेच्या आर.ओ. फिल्टर पाणी एटीएम यंत्रणेचेही उद्‌घाटन या वेळी करण्यात आले. या एटीएम यंत्रणेद्वारे नागरिकांना पाच रुपयांत 20 लिटर पाणी मिळणार असून, त्यासाठी एटीएम कार्डचे वाटप नागरिकांना करण्यात आले.
जिल्हा परिषद सदस्या कल्पना जगताप, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप यांच्या वतीने प्रदीप कंद यांच्या वाढदिवसानिमित्त अष्टापुरात 1021 रोपे लावण्यास सुरवात करण्यात आली.

कंद यांच्या लोणीकंद येथील निवासस्थानी विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर गर्दी केली होती.

Web Title: inauguration of cctv ro plant for Pradeep Kands birthday