मावळात विद्यार्थ्यांसाठी शाळेत नवीन वर्गखोलीचे उद्धाटन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

टाकवे बुद्रुक - आंदर मावळातील भोयरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीचे उद्घाटन करण्यात आले. पिंपरी येथील ध्रिसेनक्रुप इंडिया लिमिटेड या कंपनीतील कामगारांनी एक दिवसाचे वेतनातून वर्ग खोली बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. 

इयत्ता पहिली ते सातवी पर्यत सुमारे सव्वा दोनशे  विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. कशाळ, कल्हाट, पवळेवाडी, कोंडिवडे, किवळे, कुणे अनसुटे सह परिसरातील वाड्या वस्त्यांमधील विद्यार्थी येत आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी एका वर्ग खोलीची गरज होती. सकाळने विद्यार्थ्यांची गैरसोय ध्रिसेनक्रुपच्या वरिष्ठ अधिकारी व कामगार संघटनेच्या निदर्शनास आणून दिली. कारखान्यातील कामगारांनी तत्परतेने निधी देऊन हे काम मार्गी लावले. 

येथील शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायतीच्या वतीने सहकार्य केले. सर्व शिक्षकवृंदाने या कामाचा दर्जा अधिक राहील याकडे लक्ष वेधले. थ्रिसेनक्रुप कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल गोडसे, रणजित मोहिते, विपुल बिरंजे, गोविंद सोनी, सकाळचे बातमीदार रामदास वाडेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे बाळासाहेब भोईरकर, उत्तम भोईरकर, माऊली भोईरकर, प्रमिला सुळके यांच्या सह ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामचंद्र विरणक यांनी प्रास्ताविक केले. तानाजी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. बळिराम भोईरकर यांनी आभार मानले. 

Web Title: Inauguration of a new class room for students in Maavali