सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन थाटात संपन्न

junnar
junnar

जुन्नर (पुणे) : गोळेगांव (ता.जुन्नर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकरी सोसायटीच्या नुतन वास्तूचे उद्घाटन आ. शरद सोनावणे, पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक व जुन्नर बाजार समितीचे सभापती अॅड. संजय काळे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (ता.18) सांयकाळी पार पडले.

यावेळी गटनेत्या आशा बुचके, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, मोहित ढमाले, विघ्नहरचे संचालक संतोषनाना खैरे, धनंजय डुंबरे, सोसायटीचे चेअरमन जितेंद्र बिडवई, व्हाईस चेअरमन कुंदा वऱ्हाडी, सचिव भाऊ भास्कर, गोळेगांवच्या सरपंच शारदा लोखंडे, विभागीय अधिकारी सुभाष कवडे, बाळासाहेब मुरादे, सहाय्यक निबंधक माळवे , लेण्याद्री देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर, माजी अध्यक्ष जयवंत डोके, सचिव शंकरराव ताम्हाणे, गिरीजा पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश बिडवई  ,नगरसेवक भाऊ कुंभार, सुवर्णा बनकर, सरपंच संतोष केदारी , विकास अधिकारी  भरत मेहेर, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे, माजी सरपंच ज्योती डोके,  अलका माळी , भगवान बिडवई, भारत शेटे, तुकाराम लोखंडे, जयवंता चौधरी, गणपत मेहेर,  विकास ताम्हाणे, रोहीदास बिडवई, अशोक वऱ्हाडी, आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. 

अॅड.संजय काळे यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल कौतुक केले व संस्थेस एक संगणक देण्याचे जाहीर केले कोट: आमदार सोनवणे म्हणाले सहकारी सेवा संस्थाच्या  वाढीसाठी त्यांनी व्यवसाय करणे गरजेचे असून "अटल पणन योजनेचा " लाभ सहकारी सोसायट्यांनी घ्यावा असे आवाहन केले. 

जितेंद्र बिडवई म्हणाले संस्था स्थापनेला ५६ वर्षे झाली असुन संस्थेचे एकून  ५१७ सभासद आहेत यापैकी  ३७५ सभासदांना तीन कोटी ९२ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेची अद्यावत नूतन इमारत एक वर्षात पुर्ण केली आहे. सुहास शेटे यांनी सूत्रसंचालन केले. शंकरराव ताम्हाणे यांनी आभार मानले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com