विद्यापीठाच्या स्मार्ट ट्रेनिंग ॲड इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन

pune
punesakal

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्मार्ट ट्रेनिंग ॲण्ड इनोव्हेशन सेंटरचे (स्टीक) बुधवारी उद्घाटन करण्यात आले. पिंपरीचिंचवड महापालिका आणि विद्यापीठाने एकत्र येत हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि पीसीएमसीच्या महापौर उषा ढोरे यांनी या अभ्यासक्रमाचे अधिकृत उद्घाटन केले. (SPPU Pune News)

कार्यक्रमाला आमदार लक्ष्मण जगताप, पीसीएमसीचे आयुक्त राजेश पाटील, प्रकुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, डॉ. अपूर्वा पालकर, सिनेट सदस्य संतोष ढोरे, प्रसेनजीत फडणवीस आदी उपस्थित होते. डॉ. करमळकर म्हणाले,‘‘नियमीतच्या पदवी शिक्षणाबरोबर उद्योगांना अपेक्षीत कौशल्य आता अनिवार्य झाले आहे. उद्योगांना लागणारे स्मार्ट मनुष्यबळ पुरविण्याचा प्रयत्न या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून होणार आहे. केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी नव्हे, तर सॉफ्ट स्किल्सच्या माध्यमातून मानव्यविद्याशाखेतही असे प्रयोग झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विद्यापीठ प्रयत्न करत आहे.’’

pune
पदवी प्रवेशासाठी CET नाही; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण

उद्योगनगरी म्हणून ओळख असलेली पिंपरी चिंचवड महापालिका आर्थिक बाबतीत या अभ्यासक्रमासाठी कणखर पणे उभी आहे. एकवेळ विकासकामे उशिरा झाली तर फार परिणाम होत नाही. पण शिक्षणाला पैसा कमी पडला तर कैक पिढ्यांवर परिणाम होतो. बुद्धीमत्ता आणि श्रम एकत्र आणत विद्यापीठाने पिंपरीचिंचवडला एक वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी दिली आहे, असे मत जगताप यांनी व्यक्त केले.

चार प्रकारचे अभ्यासक्रम :

१) मायक्रोसॉफ्ट क्लाउड ॲममिनीस्ट्रेटर

२) रेडहॅट- लिनक्स ॲडमिनिस्ट्रेशन

३) ऑटोकॅड फॉर डिझायनिंग ॲण्ड ड्राफ्टींग

४) एसएपी ॲण्ड मटेरिअल मॅनेजमेंट, एसएपी एबीएपी

पात्रता :

अभियांत्रिकी, संगणकशास्त्र आणि विज्ञान क्षेत्रातील पदवी

अभ्यासक्रमाचे स्वरूप :

- ऑनलाइन आणि ऑफलाईन प्रसिक्षण

- पीसीएमसी ऑटोक्लस्टरमधील उद्योगांचा सहभाग

- शैक्षणिक शुल्क इतर संस्थांपेक्षा कमी

---------

प्रवेश आणि अधिक माहितीसाठी संकेतस्थळ :

https://sticonline.in/index.php

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com