प्रकल्प पूर्ण नसताना श्रेय घेण्यासाठी उद्घाटने केली - गिरीश बापट

project
project

वारजे माळवाडी (पुणे) : "माजी पालकमंत्री अजित पवार यांनी दोन वर्षांपूर्वी या पाण्याच्या टाकीचे पहाटे येऊन उद्घाटन केले होते. परंतु टाकीचे जलवाहिन्याचे नेटवर्किंग पूर्ण झाले नव्हते. त्या टाकीत आजपर्यंत पाणीच पोचले नव्हते. त्यामुळे नागरिकांना पाणी मिळाले नव्हते. त्यावेळी पवारांनी प्रकल्प पूर्ण नसताना श्रेय घेण्यासाठी उद्घाटने केली." असा आरोप पालकमंत्री गिरीश बापट यांनी केला आहे. 

वारजे जलशुद्धीकरण केंद्रातील ९० लाख लिटरच्या पाण्याची टाकी बांधली आहे तसेच युवकांना स्किल डेव्हलपमेंटचे विषय शिकविण्यासाठीच्या  लाईट हाऊस या इमारतीचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पार पडला. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. 

स्थानिक नगरसेवक सुशील मेंगडे, नगरसेवक राजेश बराटे, नगरसेविका वृषाली चौधरी यांच्या प्रभागातील या दोन्ही प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री बापट यांच्या हस्ते झाले. आमदार भीमराव तापकीर, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, युवा मोर्चा अध्यक्ष व नगरसेवक दिपक पोटे, नगरसेवक राजेश येनपुरे, नगरसेविका छाया मारणे, माजी नगरसेवक शिवराम मेंगडे, सरचिटणीस गणेश घोष, युवा मोर्चा सरचिटणीस पुनीत जोशी उपस्थितीत होते.

बापट म्हणाले, "त्यावेळी, या पाण्याच्या टाकीचे जलवाहिन्याचे नेटवर्किंग पूर्ण झाले नव्हते. म्हणून पाणी नागरिकांना मिळत नव्हते. आता त्यासाठी अडीच कोटी रुपये खर्चून टाकीचे जलवाहिन्याचे नेटवर्किंग पूर्ण केले आहे. आता यामुळे, वारजे कर्वेनगर भागातील नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे. हे काम पूर्ण झाले. म्हणून आम्ही त्याचे खऱ्या अर्थाने उद्घाटन करीत आहोत."

बापट म्हणाले, सध्या बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत गंभीर असून लाईट हाऊस हे आजच्या बेरोजगार तरूण तरूणीसाठी एक उत्पन्नाचे साधन आहे. सरकार याबाबत अनेक ठोस पाऊले उचलून विविध योजना राबवित आहे. यावेळी भविष्यात बेरोजगारीचा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल."

गोगवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाला हाताला साथ, प्रत्येक हाताला काम याच उद्देश्यांने पुणे शहरात लाईट हाऊस प्रकल्प राबवून या मार्फत तरूण तरूणींना १००% नोकरी मिळावी हेच आमचे ध्येय आहे." 

तापकीर म्हणाले, " वारजे जलशुध्दीकरण केंद्र रखडलेल्या काम भाजप पालिकेत सत्ता असल्याने आणि या भागातील भाजपच्या नगरसेवकांमुळे मार्गी लागले आहे."
 नगरसेवक मेंगडे म्हणाले, वारजे कर्वेनगर भागातील नागरिकांना या टाकीतून थेट पुरेशा प्रमाणात पाणी मिळणार आहे. टाकी उंचावर असल्याने या परिसरातील  अनेक सोसायट्यात तिसऱ्या चौथ्या मजल्यावर थेट पाणी जाईल. 

तिरुपती नगर वारजे येथे या भागातील १८ ते ३० वयोगटातील तरुण- तरुणींसाठी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी गुणवत्तापूर्ण उद्योजकतेच्या कौशल्यं विकासाच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या केंद्राचे म्हणजेच स्कील डेव्हलपमेंट सेंटरचे कोर्स येथे शिकविले जाणार आहेत. वारजे - कर्वेनगर भागातील भविष्यातील २५ वर्षातील पाण्याची गरज लक्षात घेता वारजे जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याची टाकी बांधली आहे. ही दोन्ही कामे पूर्ण करून घेण्यासाठी स्थानिक नगरसेवक सुशील मेंगडे , नगरसेवक राजेश बराटे, नगरसेविका वृषाली चौधरी या तिघांनी एक वर्षापासून प्रयत्न केले. 
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शंतनू खिलारे तर आभार श्रीनाथ भिमाले यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com