ओतूरच्या बहुउद्देशीय स्टेडियमचे राज ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण

पराग जगताप
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

ओतूर (पुणे) : ओतूर (ता.जुन्नर) येथील ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वर मंदिर परिसरात माजी आमदार कै.श्रीकृष्ण रामजी तांबे बहुउद्देशीय स्टेडियमचे (कुस्ती आखाडा) काम पूर्णत्वाकडे असुन येत्या श्रावणी सोमवारी (ता. 3) सप्टेंबर रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याचे आमदार शरद सोनवणे यांनी सांगितले.

ओतूर (पुणे) : ओतूर (ता.जुन्नर) येथील ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वर मंदिर परिसरात माजी आमदार कै.श्रीकृष्ण रामजी तांबे बहुउद्देशीय स्टेडियमचे (कुस्ती आखाडा) काम पूर्णत्वाकडे असुन येत्या श्रावणी सोमवारी (ता. 3) सप्टेंबर रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याचे आमदार शरद सोनवणे यांनी सांगितले.

कपर्दिकेश्वर यात्रेत मागील वर्षी आमदार सोनवणे यांनी पुढील वर्षी स्वखर्चातून ओतूरच्या कुस्ती आखाड्यासाठी भव्य स्टेडिअम वर्षभरात बांधून देणार असा शब्द हजारो कुस्तीपटूंना दिला होता. दिलेला शब्द पाळत आमदार सोनवणे यांनी सुमारे 75 लाख रूपये खर्चाचे भव्य कुस्ती स्टेडियमची निर्मीतीचे काम गेल्या महिन्यापासून हाती घेतले ते आता अंतिम टप्प्यात आहे. या कुस्ती स्टेडियममुळे ओतूरच्या वैभवात आणखी भर पडणार असुन पुढील काळात कुस्ती मध्ये करीअर करणाऱ्या कुस्तीगीरांना हे स्टेडीअम पर्वणी ठरणार आहे.इतर ही विविध कार्यक्रम व स्पर्धांसाठी या स्टेडिअमचा वापर वर्षभर करता येणार आहे.

या स्टेडियमचे काम इंद्रशिल्प कंस्ट्रशन्सचे मालक ठेकेदार सचिन घोलप, श्री विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक धनंजय डुंबरे, प्रकाश हिंगणे, विक्रम अवचट, अशोक काळे, श्री कपर्दिकेश्वर देव-धर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांब व सर्व संचालक, ग्रामपंचायत ओतूर व ग्रामस्थांच्या देखरेखीखाली सुरू आहे. स्टेडियमच्या डिझाईनचे काम आर्किटेक्ट अरविंद वैद्य यांनी केले आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते चौथ्या श्रावणी सोमवारी (ता. 3) सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता होणार आहे. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, पुणे जिल्हाधिकारी राम किशोर नवल, मंगलदास बांदल, महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष पै.संदिप भोंडवे, महाराष्ट्र केसरी अभिजीत खटके, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे महापौर राहुल जाधव, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय काळे यांच्यासह तालुक्यातील विविध मान्यवरच्या उपस्थितीत होणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

तर आमदार सोनवणे यांनी मागील वर्षी ओतूरकरांना व कुस्ती शौकिनांना भव्य कुस्ती आखाडा स्टेडियमच्या निर्मीतीचे काम पूर्ण करण्याचा जो शब्द दिला होता, तो पाळला असुन कपर्दिकेश्वर यात्रेनिमीत्त येणाऱ्या लाखो भाविकाकडून भव्य स्टेडियम निर्मितीचे काम पाहून सोनवणे यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

चौथ्या श्रावणी सोमवारी कै.श्रीकृष्ण रामजी तांबे स्टेडियम लोकाअर्पण सोहळ्यावेळी कपर्दिकेश्वर देवधर्म संस्था व सर्व ग्रामस्थ ओतूर यांच्याकडून आमदार शरद सोनवणे यांची पेढ्याची तुला केली जाणार आहे.

Web Title: inauguration by Raj Thackeray of stadium at otur