खानापूर - प्रभारी महसूल निरीक्षक रमेश हरेवळ्ळींना लाच घेताना रंगेहात पकडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

खानापूर : नगरपंचायतमध्ये कार्यरत असलेले प्रभारी महसूल निरीक्षक रमेश हरेवळ्ळी यांना 15 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

खानापूर : नगरपंचायतमध्ये कार्यरत असलेले प्रभारी महसूल निरीक्षक रमेश हरेवळ्ळी यांना 15 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

भरत अळवणी यांनी दुर्गानगर येथे घराला लागून असलेली जागा खरेदी केली. ती नोंदणी करण्यासाठी नगरपंचायतमध्ये अर्ज केला होता. हरेवळ्ळी यांनी 35 हजारमाची लाच मागितली. त्यापैकी 10 हजार दिले होते. उर्वरीत रक्कमेसाठी अळवणीच्या मागे तगादा लावला होता. त्यापैकी 10 हजार रुपये सोमवारी देताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. एसीबीचे पोलिस प्रमुख अमरनाथ रेड्डी, उपाधीक्षक जे. रघू यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस निरीक्षक वाय. एस. धरनायक, विश्वनाथ कब्बुरी व सहकाऱ्यांनी धाड टाकून रमेश हरेवळ्ळी यांना ताब्यात घेतले. या धडक कारवाईमुळे खानापूरात अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: Incharge Revenue Inspector caught while accepting bribe

टॅग्स