
फिर्यादी आकाश जागडे हा शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील भगवा चौकातील निमंत्रण हॉटेलसमोरुन त्याच्या घरी जात होता.
पुणे : नागरिकास मारहाण करताना तेथे उभ्या असलेल्या तरुणासह त्याच्या मित्राला टोळक्याने भर चौकात लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याबरोबरच रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक करीत वाहनांचे नुकसान करीत दहशत निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना सिंहगड रोड परिसरातील भगवा चौकामध्ये शुक्रवारी (ता.५) रात्री पावणे अकरा वाजता घडली. दरम्यान, याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी पाच जणांना अटक केली.
ओंकार प्रकाश राक्षे (वय 21, रा. जाधवनगर, वडगाव), शाहू संजीवन देशमुख (वय 21, रा. आंबेगाव बुद्रुक), सुहास रघू गाडे (वय 23), कुणाल रविंद्र राशिनकर (वय 18), वैभव चंद्रकांत पवळे (तिघेही रा. वडगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत आकाश जागडे (वय 21, रा. धायरी) याने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
- पुणे पोलिस अॅक्शन मोडमध्ये; गुंडाला शहरात राहण्यास व प्रवेश करण्यास मनाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश जागडे हा शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील भगवा चौकातील निमंत्रण हॉटेलसमोरुन त्याच्या घरी जात होता. त्यावेळी त्यास तेथे मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसली. तसेच तेथे तीन तरुणांकडून एका नागरिकास बेदम मारहाण होत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यापैकी एकाने काहीही कारण नसताना फिर्यादीसह अन्य नागरिकांनाही हाताने मारहाण केली. त्यानंतर जागडे याने त्यांच्या गावातील मुलगा आकाश पासलकर यास तेथे बोलावून घेतले. त्यावेळी आकाश त्यांना समजावून सांगत असताना त्यांनी आकाशलाही शिवीगाळ करीत जबर मारहाण केली. त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकी दिली.
- बारामतीकर रिक्षाचालकाचा लावणीवर जबरी डान्स, व्हिडिओ व्हायरल
त्यानंतर तेथे आलेल्या आणखी चार ते पाच जणांनी फिर्यादी आणि पासलकर या दोघांनाही हाताने मारहाण केली. तसेच रस्त्याच्या कडेला पडलेले दगड उचलून रस्त्याच्याकडेला पार्किंग केलेल्या वाहनांवर फेकून मारीत गाड्यांचे नुकसान केले. तसेच काही दगड तेथे जमलेल्या नागरिकांच्या दिशेने मारत आरडाओरडा केला. त्यांच्या या दहशतीमुळे व्यावसायिकांनी घाबरून दुकाने तत्काळ बंद केली. त्यानंतर ते सर्वजण तेथून वडगाव येथील उड्डाणपुलाच्या दिशेने दुचाकीवरुन निघून गेले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)