BVG प्राप्तिकर विभागाच्या निशाण्यावर; चिंचवडमधील कार्यालयावर छापा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

- 'भारत विकास ग्रुप'वर (बिव्हीजी) बुधवारी सकाळी प्राप्तिकर विभागाने धाड टाकली आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पिंपरी येथे कंपनीचे मुख्य कार्यालय आहे.
-सकाळी दहा वाजता याठिकाणी प्राप्तिकर विभागाचे 30-40 अधिकारी, कर्मचारी आले. त्यांनी कार्यालयाचे दरवाजे आतून बंद केले.
- कोणत्याही कर्मचाऱ्याला बाहेर सोडलेले नाही. सर्वांचे मोबाईल काढून घेतले असून, कार्यालयातील दूरध्वनीही बंद केले आहेत.

पिंपरी : हाऊस किपिंग व आरोग्य सेवा क्षेत्रातील नामवंत कंपनी असलेल्या 'भारत विकास ग्रुप'वर (बिव्हीजी) बुधवारी सकाळी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील चिंचवड येथे कंपनीचे मुख्य कार्यालय आहे.

सकाळी दहा वाजता याठिकाणी प्राप्तिकर विभागाचे 30-40 अधिकारी, कर्मचारी आले. त्यांनी कार्यालयाचे दरवाजे आतून बंद केले. कोणत्याही कर्मचाऱ्याला बाहेर सोडलेले नाही. सर्वांचे मोबाईल काढून घेतले असून, कार्यालयातील दूरध्वनीही बंद केले आहेत.

दरम्यान, कार्यालयासमोर बघ्यांची गर्दी झाली आहे. कंपनीच्या दिल्ली व मुंबई येथील कार्यालयावरही धाड टाकण्यात आल्याचेही समजते आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Income Tax department Raid at Bharat Vikas Group at Pimpari