Pune-Municipal
Pune-Municipal

मिळकतकर वसुलीसाठी महापालिकेची मोहीम

पुणे - मिळकतकरात सवलत मिळणारी अभय योजना जाहीर होण्याच्या आशेने थकबाकी भरण्यासाठी मिळकतधारक पुढे येत नसल्याचे दिसून येताच महापालिका प्रशासनाने थकबाकीदारांकडे आपली नजर वळविली आहे. थकबाकी असलेल्या निवासी आणि व्यावसायिक मिळकतधारकांना नोटीस बजाविली असून, ती न भरल्यास मिळकतींना टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. या मोहिमेमुळे पुढील दोन महिन्यांत दीडशे कोटींची थकबाकी जमा होण्याचा अंदाज आहे. 

शहर आणि उपनगरांमध्ये सव्वाआठ लाखांहून अधिक मिळकती आहेत. त्यात निवासी आणि व्यावसायिक मिळकतींचा समावेश आहे. त्यातील काही मिळकतधारकांकडे अडीच ते तीन हजार कोटींची थकबाकी आहे. विशेषत: मोबाईल टॉवर कंपन्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तरीही तब्बल दोन हजार कोटी रुपयांची थकबाकी वसूल होणे अपेक्षित आहे. परंतु, अशा थकबाकीदारांना दंडाच्या रकमेत सवलत देणारी अभय योजना महापालिकेने गेल्या तीन वर्षांत दोनदा जाहीर केली होती. त्यामुळे थकबाकी वसूल झाली आणि थकबाकीदारांनाही फायदा झाला. 

महापालिकेच्या उत्पन्नात घट होत असल्याने यंदा पुन्हा मिळकतकर वसुलीवर भर दिला आहे. चालू आर्थिक वर्षात या करातून १ हजार ६०० कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, आतापर्यंत केवळ एक हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. उर्वरित सहाशे कोटींपैकी आणखी शंभर ते दीडशे कोटीच जमा होण्याचा अंदाज आहे. या पार्श्‍वभूमीवर थकबाकी वसूल करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com