मिळकतधारकांना सामान्य करात सवलत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

पिंपरी - करदात्यांना दिलासा मिळावा, यासाठी २०१८-१९ या आर्थिक वर्षातील मिळकतकराची थकबाकीसह दोन्ही सहामाहीच्या संपूर्ण बिलाची रक्कम ३० जून २०१८ पर्यंत एक रकमी भरल्यास मिळकतधारकांना सामान्य करात सवलत दिली जाणार आहे. 

पिंपरी - करदात्यांना दिलासा मिळावा, यासाठी २०१८-१९ या आर्थिक वर्षातील मिळकतकराची थकबाकीसह दोन्ही सहामाहीच्या संपूर्ण बिलाची रक्कम ३० जून २०१८ पर्यंत एक रकमी भरल्यास मिळकतधारकांना सामान्य करात सवलत दिली जाणार आहे. 

माजी सैनिक व स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या पत्नी राहत असलेल्या मिळकतीस ५० टक्के, महिलांच्या नावे असलेल्या निवासी घरास ५० टक्के, ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्या अंध, अपंग, कर्णबधिर व मूकबधिर यांच्या नावावर असणाऱ्या मिळकतीस ५० टक्के, ग्रीन बिल्डिंग रेटिंग सिस्टिम राबविणाऱ्या मिळकतीस ५ ते १५ टक्के, स्वतंत्र नोंद असलेल्या निवासी मिळकतीस १० टक्के, तर बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक, मोकळ्या जमिनी यासाठी ५ टक्के सामान्य करात सवलत दिली जाणार आहे.

ऑनलाइनसाठीही ऑफर
मिळकत कराचा ३० जूनअखेर ऑनलाइन भरणा केल्यास चालू वर्षाच्या मागणीतील सामान्य करात पाच टक्के सवलत व त्यापुढे ३१ मार्च २०१९ अखेर ऑनलाइन भरणा केल्यास चालू वर्षाच्या मागणीतील सामान्य करात दोन टक्के सवलत मिळणार आहे. मिळकतधारकांना १६ करसंकलन विभागीय कार्यालय, महापालिकेची आठ क्षेत्रीय कार्यालये व www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पेमेंट गेट-वेद्वारे मिळकतकराचा भरणा स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याशिवाय रोख, धनादेश आणि डीडीद्वारेदेखील कराचा भरणा करता येणार आहे.

मिळकतधारकांनी ३० जून २०१८ पर्यंत कराचा भरणा करून या सवलत योजनेचा लाभ घ्यावा.
- दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त

Web Title: Income taxpayer tax concession