कर्मचारी बैठकीला गेल्याने आरटीओत आलेल्या नागरिकांचा खोळंबा 

rto.jpg
rto.jpg

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) पाहणी करण्यासाठी परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी शनिवारी आरटीओ कार्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांची बैठक घेतल्याने सुमारे दीड तास आरटीओतील कामकाज ठप्प होते.
 
कोणतीही पूर्वसूचना न देता सर्व कर्मचारी बैठकीसाठी निघून गेल्याने विविध कामांसाठी आरटीओमध्ये आलेले नागरिक सुमारे दीड तास काऊंटरसमोर ताटकळत थांबले होते. सकाळी 11 ते दुपारी साडेबारा दरम्यान हा प्रकार घडला. परवाना काढणे, त्यांचे नूतनीकरण करणे, कर भरणा, आरसी बुक, विमा काढणे अशा विविध कामासाठी दररोज हजारो नागरिक आरटीओमध्ये येत असतात. मात्र, आयुक्त चन्ने यांनी अधिकारी - कर्मचारी यांची अचानक बैठक घेतल्याने नागरिकांना त्यांच्या कामासाठी ताटकळत थांबावे लागले. चन्ने सकाळीच आरटीओत दाखल झाले होते. कामकाजाची पाहणी केल्यानंतर त्यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी अकराच्या सुमारास बैठक बोलविली होती. 

''सुटी काढून किंवा कामावर असताना वेळ काढून नागरिक आरटीओत त्यांची कामे करण्यासाठी येतात. मात्र त्यांना कोणतीही पूर्व कल्पना न देता अशा प्रकारची बैठक आयोजित केली तर नागरिकांनी काय करायचे. मी सकाळी 11 वाजता आरटीओत गेलो होते. तेव्हापासून रांगेत थांबलो होतो. मात्र सर्व कर्मचारी बैठकीला गेले असल्याने त्यांची वाट पाहत सुमारे दीड तास थांबावे लागले. यावेळी अनेक नागरिक कर्मचाऱ्यांची वाट वाहत होते,'' अशी माहिती नौदलातील माझी अधिकारी संजय साळवी यांनी दिली. साळवी हे त्यांचा दुचाकी व चारचाकीच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी आरटीओत गेले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com