पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय 

mumbai-pune-expressway.jpg
mumbai-pune-expressway.jpg

सोमाटणे(पुणे) : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्‍यानजीक ओव्हरहेड गँट्री (जाहिरात फलक) बसविण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने गुरुवारी (ता. 9) दुपारी 12 ते दोन या वेळेत ब्लॉक घेतला होता. या दरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबविल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. दुपारी सव्वादोननंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. 

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सर्व अवजड वाहने किवळे, शिरगाव, सोमाटणे पुलादरम्यान थांबविण्यात आली होती. तर हलकी वाहने किवळे येथून जुन्या पुणे मुंबई महामार्गाने वळविण्यात आली होती. द्रुतगती मार्गावरील मुंबई लेन बंदबाबतची पूर्वसूचना मिळाल्याने ऐंशी टक्के वाहनचालकांनी पहाटेपासूनच जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने प्रवास करणे पसंत केला. त्यामुळे द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या सकाळी दहा वाजल्यापासून कमी झाली होती. त्यामुळे काम संपल्यानंतर अर्ध्या तासातच वाहतूक सुरळीत झाली.

दुसरीकडे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. सोमाटणे टोलनाका, सोमाटणे फाटा, वडगाव फाटा, पवनानगर चौक, वळवण टोल नाका येथे वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे या मार्गावर वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. दुपारी साडेतीननंतर वाहतूक सुरळीत झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com